सेवानिवृत्तीनंतरही खेळाडूंना मार्गदर्शन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:26 AM2021-04-06T04:26:49+5:302021-04-06T04:26:49+5:30
चंद्रपूर : जिल्हा क्रीडा संकुल आणि ज्येष्ठ व्हॉलिबॉल बहूद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्यासोबत भविष्यातही जोडून राहणार असून, सेवानिवृत्ती झाली म्हणून ...
चंद्रपूर : जिल्हा क्रीडा संकुल आणि ज्येष्ठ व्हॉलिबॉल बहूद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्यासोबत भविष्यातही जोडून राहणार असून, सेवानिवृत्ती झाली म्हणून घरी न राहता यापुढेही जिल्ह्यातील खेळाडूंना मार्गदर्शन करणार असल्याचे मत क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक समद पटेल यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक समद पटेल हे सेवानिवृत्त झाले. यानिमित्त ज्येष्ठ व्हॉलिबॉल बहूद्देशीय संस्थेद्वारे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जानवे, सचिव दीपक जेऊरकर, उपाध्यक्ष श्यामकांत थेरे व कोषाध्यक्ष रामास्वामी कापरबोयाना यांची मंचावर उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांनी क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक यांच्याबाबत गौरोद्गार काढले. हेमंत घिवे, राजीव चौधरी व प्रा. संदीप ढोबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
संचालन संस्थेचे सचिव दीपक जेऊरकर, आभार नरेंद्र कुंभारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अमित दिकोण्डवार, अरविंद पुराणकर, सुनील कायरकर, चेतन गजलवार व प्रवीण चवरे आदींनी परिश्रम घेतले.