अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:08+5:302021-05-27T04:30:08+5:30
बॉक्स जिल्ह्यातून पाच हजार ५३५ अर्ज १ महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा होता. यामध्ये अनुदान तत्वावरील सोयाबीन, ...
बॉक्स
जिल्ह्यातून पाच हजार ५३५ अर्ज
१ महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा होता. यामध्ये अनुदान तत्वावरील सोयाबीन, तूर, मका कडधान्य आदी बियाणांसाठी सोमवारपर्यंत ५५३५ अर्ज आले होते.
२ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान प्रात्यक्षिक पीक योजनेतील भात पीक, तेलताळ अभियान, कडधान्य कार्यक्रम, कापूस विकास कार्यक्रम यासाठी ४५४७ अर्ज कृषी विभागाकडे आले आहे.
३ आलेल्या अर्जातून सोडत काढून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
बॉक्स
यांत्रिक शेतीसाठी १० हजार ९२३ अर्ज
‘अर्ज एक योजना अनेक’ हे ब्रीद जोपासत महाडीबीटी योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना रोटावेटर, कल्टीवेटर, ट्रॅक्टर आदी प्रकारचे यंत्र अनुदान तत्वावर उपलब्ध करुन दिले जातात. यासाठी जिल्ह्यातील १० हजार ९२३ जणांनी अर्ज केले आहेत. लॉटरी काढून याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
बॉक्स
एसएमएस आला तरच मिळणार लाभ
सोडत काढल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची निवड होते. अशा शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर तसा संदेश पाठविला जातो. त्यामुळे शेतकरी संदेशाची वाट बघत असतात. उद्दिष्टांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी बियाणांसाठी अर्ज केले असल्याने सोडतीमध्ये निवड झालेल्यांनाच संदेश पाठविला जाईल. त्यांनतर शेतकरी आपल्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
--------
कोट
शेतकऱ्यांना कृषी विषयक योजनेचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी योजना राबविण्यात आली. या अंतर्गत प्रात्यक्षिक योजनेसाठी जिल्ह्यातील ४५४७ जणांनी तर अनुदानित बियाणांसाठी ५५३५ जणांनी अर्ज केले आहे. यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्याला तसा एसएमएस पाठवून कळविण्यात येणार आहे.
-भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, चंद्रपूर
----------
कोणत्या योजनांसाठी किती अर्ज
अनुदानावरील भात पीक १६८७
गळीत धान्य व तेलताळ २३०७
कडधान्य कार्यक्रम १५४१
प्रात्यक्षिक योजना ४५४७
------
अर्ज केलेले शेतकरी काय म्हणतात
अनुदानित बियाणांसाठी रीतसर अर्ज केला आहे. योजनेचा लाभ मिळाल्यास बियाणांची मोठी अडचण दूर होणार आहे. बियाणांसाठी देण्यात येणारे अनुदान तोकडे असल्याने ते अनुदान वाढविण्यात यावे.
-शेतकरी
-------
महाडीबीटी पोर्टलवर अनेक शेतकरी अर्ज करतात.परंतु, सोडतीमध्ये निघालेल्यांच लाभ मिळतो. दरवर्षी उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज जात असल्याने अनेकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
-शेतकरी