आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:28 AM2021-07-31T04:28:18+5:302021-07-31T04:28:18+5:30

चिमूर : सध्या कोरोना संकट असून, या काळात प्रशासन किंवा सामाजिक संघटनाच्या माध्यमातून मदतीचा ओघ आदिवासी लाभार्थ्यांना पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी ...

Will solve the problems of tribal brothers | आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविणार

आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविणार

Next

चिमूर : सध्या कोरोना संकट असून, या काळात प्रशासन किंवा सामाजिक संघटनाच्या माध्यमातून मदतीचा ओघ आदिवासी लाभार्थ्यांना पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करीत आहे. आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रात १२ हजार ५०० खावटी कीट वाटप करण्यात येत असून, आदिवासी लाभार्थ्यांना दोन हजार रुपये अनुदान त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आपल्या समस्या, अडचणी असल्यास त्या सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आमदार बंटी भांगडिया यांनी सांगितले.

आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या नाशिक उपप्रादेशिक कार्यालय चिमूर व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य कीट वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी वसंत वारजूकर, भाजपचे जिल्हा सचिव राजू देवतळे, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, सहायक प्रकल्प अधिकारी जुनघरे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नामेवार, समीर राचलवार, प्रदीप कामडी, माया नन्नावरे, सरपंच प्रफुल कोलते, उपसरपंच राजू साठोने, आदी उपस्थित होते.

Web Title: Will solve the problems of tribal brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.