सन्मानाने जगण्यासाठीच बौद्ध धम्म दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:18 AM2018-05-06T00:18:00+5:302018-05-06T00:18:00+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण होते. हे स्वप्न साकार करून सन्मानाने जगण्यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा घेणे आवश्यक आहे, असे मत राजरत्न अशोक आंबेडकर यांनी व्यक्त केले.

To win the honor, Buddhist Dhama Diksha | सन्मानाने जगण्यासाठीच बौद्ध धम्म दीक्षा

सन्मानाने जगण्यासाठीच बौद्ध धम्म दीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : बाबूपेठ येथे बौद्ध धम्म दीक्षा समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण होते. हे स्वप्न साकार करून सन्मानाने जगण्यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा घेणे आवश्यक आहे, असे मत राजरत्न अशोक आंबेडकर यांनी व्यक्त केले. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबूपेठ येथे बौद्ध धम्म नोंदणी व दीक्षा समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
भंते श्रद्धापाल महास्थवीर यांनी समारंभाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी कृपाशरण महाथेरो तर मंचावर बंडू रामटेके, डॉ. कोसे, एम. डब्ल्यू. पुनवटकर, एन.डी. पिंपळे, सदानंद बेंद्रे आदी उपस्थित होते.
दीक्षा समारंभाची सुरुवात भदंत श्रद्धापाल यांनी त्रिशरण पंचशील वंदना देऊन केली. राजरत्न अशोक आंबेडकर यांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा ग्रहण करविल्या. राजरत्न आंबेडकर यांनी भारतीय बौद्धांचे नेतृत्व आणि जागतिक बौद्ध राष्ट्रातील भारतीयांची भूमिका आदी पैलुंवर विचार मांडले. त्रिपीटक हा बौद्ध धम्म ग्रंथ प्रेरणादायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगातील बौद्ध राष्ट्रांशी भारतीय बौद्धांचे संबंध प्रस्थापित करायचे होते. ते कार्य आता ‘दी बुद्धीस्ट सोसायटी आॅफ इंडिया’ करणार आहे, असेही त्यांनी नमुद केले.
जगातील बौद्ध राष्ट्रांशी भारतीय बौद्धांचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारतातील सर्व राज्यांमध्ये बौद्ध परिषदा आयोजित केल्या जात आहे. धम्म विचाराने विज्ञानाची कास धरली असून चुकीच्या विचारांना या तत्त्वज्ञानात कदापि थारा नाही, असे मत भंते श्रद्धापाल महास्थवीर यांनी व्यक्त केले. संचालन एन. डी. पिंपळे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते सुभाष खाडे यांनी धम्मकार्य गतिमान व्हावे यासाठी राजरत्न आंबेडकरांना धम्मदान दिले. यावेळी सुभाष खाडे, चरण दुर्गे, प्रकाश भाले, दयाल शेंडे, कुणाल उराडे, स्वप्नील तेलसे, प्रशांत रामटेके, बादल पिंपळे, आंचल शेंडे, लक्की पिंपळे, सिशीम पाटील, रितीक अलोणे उपस्थित होते.
 

Web Title: To win the honor, Buddhist Dhama Diksha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.