तृतीया तिथीच्या वृद्धीने यंदा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 02:56 PM2024-09-28T14:56:27+5:302024-09-28T14:57:47+5:30

३ ऑक्टोबरला प्रारंभ : देवीच्या नऊ रूपांची पूजा

With the addition of Tritiya Tithi this year Navratri Festival is ten days long | तृतीया तिथीच्या वृद्धीने यंदा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा

With the addition of Tritiya Tithi this year Navratri Festival is ten days long

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
पितृपक्ष संपण्यापूर्वीच आता प्रत्येकांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहे. नवरात्रोत्सव आता । सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. यंदा नवरात्रोत्सवातील अर्थात, अश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्रोत्सव अर्थात, ९ दिवस आणि रात्रींचा सण १० दिवसांचा झाला आहे.


नवरात्र उत्सव हा महिलांच्या सबलीकरणाचा असतो. अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये यावी, हा नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीच्या ९ रूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र असे संबोधले जाते. हिंदू पंचांगानुसार यंदा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. गुरुवारी (दि. ३ ऑक्टोबर) घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवारंभ होणार आहे. शनिवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र संपन्न होणार आहे. त्यात सोमवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी आहे. बुधवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी सरस्वती आवाहन आहे. गुरुवार, दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री महालक्ष्मी पूजन आहे. त्याच दिवशी सरस्वती पूजन आहे. २००० आणि २००६ या दोन वर्षांनाही नवरात्रोत्सव दहा दिवसांचे होते. 


नऊ दिवसांचे रंग हे केवळ आनंदासाठी 
नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही; परंतु नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नसतो, तर तो सामाजिक, सांस्कृतिक असतो. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना महिलावर्गाकडून गत काही वर्षापासून नवरात्रोत्सवात नवीन अॅडिशन करण्यात आले असले, तरी धर्मग्रं- थांमध्ये त्याचा कुठेही उल्लेख नसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.


अष्टमी, नवमीचे उपवास एकाच दिवशी 
यंदाच्या वर्षी महाष्टमी आणि महानवमीचे उपवास एकाच दिवशी शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबरलाच करायचे आहेत. त्याच दिवशी सकाळी १९:४२ ते दुपारी १२:३० संधिकाल पूजा आहे. विजया दशमी-दसरा शनिवार, दि. १२ ऑक्टोबरला आहे. त्याच दिवशी सरस्वती विसर्जन आणि नवरात्रोत्थापन आहे.


घटस्थापना मुहूर्त 
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभमुहूर्त आहे. यंदा हा मुहूर्त ३ ऑक्टोबरला सकाळी ६.१५ मिनिटांपासून ते ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ४६ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल.

Web Title: With the addition of Tritiya Tithi this year Navratri Festival is ten days long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.