जिल्ह्यात‍ ॲक्टीव्ह रुग्ण तीन हजारांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:00 AM2020-10-19T05:00:00+5:302020-10-19T05:00:20+5:30

रविवारी चंद्रपूर शहर व परिसरातील बिनबा वार्ड, सिव्हील लाईन, घुग्घुस, स्नेह नगर, ऊर्जानगर, तुकुम, नगिनाबाग, घुटकाळा वार्ड, बालाजी वार्ड, लालपेठ कॉलरी, दाद महल वार्ड, आकाशवाणी रोड परिसर, जीएमसी परिसर, महाकाली वार्ड, इंदिरानगर, बाबुपेठ, केरला कॉलनी परिसर, रामनगर, भिवापूर वॉर्ड, विवेक नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

Within three thousand active patients in the district | जिल्ह्यात‍ ॲक्टीव्ह रुग्ण तीन हजारांच्या आत

जिल्ह्यात‍ ॲक्टीव्ह रुग्ण तीन हजारांच्या आत

Next
ठळक मुद्देनवे बाधित १७३ : आतापर्यत १०,२७६ बाधित कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनातून मुक्त होत असलेल्यांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत १० हजार २७६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान रविवारी नव्याने १७३ बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता १३ हजार ४०० वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन हजार ९२५ अ‍क्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
रविवारी चंद्रपूर शहर व परिसरातील बिनबा वार्ड, सिव्हील लाईन, घुग्घुस, स्नेह नगर, ऊर्जानगर, तुकुम, नगिनाबाग, घुटकाळा वार्ड, बालाजी वार्ड, लालपेठ कॉलरी, दाद महल वार्ड, आकाशवाणी रोड परिसर, जीएमसी परिसर, महाकाली वार्ड, इंदिरानगर, बाबुपेठ, केरला कॉलनी परिसर, रामनगर, भिवापूर वॉर्ड, विवेक नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
यासोबतच बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्ड, राणी लक्ष्मीबाई वार्ड, विसापूर, पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा, शिवाजी चौक, बोर्डा झुल्लुरवार, सिंदेवाही तालुक्यातील शिवनी, नवरगाव, गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापुर, करंजी, नवीन बस स्टॅन्ड, राजुरा तालुक्यातील विहिरगाव, वार्ड नंबर ४, मुल तालुक्यातील वार्ड नंबर चार, वार्ड नंबर १६, चिरोली, मारोडा, गडीसुर्ला, नांदगाव, भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगर, सुरक्षा नगर, सुमठाणा, नागभीड तालुक्यातील तळोदी, पार्डी, नवीन बस स्टॅन्ड परिसर, सुलेझरी वार्ड नंबर ८ परिसर, कोजाबी माल, बाळापुर, सावरगाव, पळसगाव, वरोरा तालुक्यातील एमएसईबी कॉलनी परिसर, चैतन्य नगर बोर्डा, कोरपना तालुक्यातील गडचांदूर, उपरवाही व ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधीनगर, बाळापूर पेठ वार्ड, टिळक नगर परिसरातून बाधित रविवारी पुढे आले आहेत. बाधितांचा आलेख कधी कमी तर कधी जास्त होत असल्याने सतर्क राहण्याची गरज आहे.

दोन बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात रविवारी दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये मुंगोली, वणी यवतमाळ येथील ५० वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला १० आॅक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. तर, दुसरा मृत्यू शिवाजी चौक परिसर, पोंभुर्णा येथील ६५ वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला १६ आॅक्टोबरला डॉ.पंत हॉस्पीटल,चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. दोन्ही बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार होता. जिल्ह्यात आतापर्यंत १९९ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १८८ बाधितांचा समावेश आहे.
तालुकानिहाय नव्या बाधितांची संख्या
जिल्ह्यात रविवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ५६, बल्लारपूर तालुक्यातील पाच, पोंभूर्णा तालुक्यातील तीन, चिमूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील ११, ब्रह्मपुरी तालुक्यातील १७, नागभीड तालुक्यातील १२, वरोरा तालुक्यातील पाच, भद्रावती तालुक्यातील १३, सिंदेवाही तालुक्यातील २१, राजुरा तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील चार, कोरपना तालुक्यातील १५, गडचिरोली व यवतमाळ येथील प्रत्येकी एक असे एकूण १७३ बाधित पुढे आले आहे.

Web Title: Within three thousand active patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.