बांधकामाच्या दोन महिन्यातच हिवरा येथील पुलाला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:03+5:302021-09-02T04:59:03+5:30
हा पूल कोसळल्यास शेकडो हेक्टरवर उभे असलेले धानपीक करपण्याची भीती आता शेतकऱ्यांना भेडसावीत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील येणाऱ्या हिवरा परिसरात ...
हा पूल कोसळल्यास शेकडो हेक्टरवर उभे असलेले धानपीक करपण्याची भीती आता शेतकऱ्यांना भेडसावीत आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील येणाऱ्या हिवरा परिसरात शेकडो हेक्टर धानशेती आहे. या धानशेतीला जंगलात असलेल्या मोठ्या तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मोठ्या तलावातील मुख्य कालवा हिवरा भागात गेला आहे. या कालव्यावर पाणी वाहून नेण्यासाठी दोन पुलाचे बांधकाम करण्यात आले. या बांधकामासाठी लघू पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. घाईघाईने या दोन्ही पुलाचे बांधकाम केल्या गेले. बांधकामाला अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत झाले. बांधकामाचा निकृष्ट दर्जा आता समोर आला आहे. दोन्ही पुलाचा स्लॅबमधून पाणी झिरपत आहे.
कोट
हिवरा परिसरातील शेतीला सिंचन करणारा हा मुख्य कालवा आहे. याच कालव्यावर पूल बांधण्यात आला. पुलाचा दर्जा निकृष्ट आहे. या कामाची चौकशी करून निकृष्ट बांधकाम करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी.
- नीलेश पुलगमकार, सरपंच, हिवरा