साक्षी देऊलवार जिल्ह्यात प्रथम
By admin | Published: May 29, 2016 12:57 AM2016-05-29T00:57:11+5:302016-05-29T00:57:11+5:30
सीबीएसई अभ्यासक्रमाचा दहावीचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला.
पालकांमध्ये आनंदोत्सव : दहावी सीबीएसईचा निकाल १०० टक्के
चंद्रपूर : सीबीएसई अभ्यासक्रमाचा दहावीचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व शाळा या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून जिल्ह्याचा निकाल १०० टक्के लागला आहे. श्री महर्षी विद्यामंदिर, चंद्रपूरची साक्षी देऊलवार ही १० सीजीपीए रँक घेऊन प्रथम जिल्ह्यात प्रथम आली आहे.
चंद्रपूर शहरात सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित १२ विद्यालये आहेत. यासोबत बल्लारपूर, दुर्गापूर, घुग्घूस, ब्रह्मपुरी, राजुरासह अनेक शहरात सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित विद्यालये आहेत. या सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. चंद्रपुरात नारायणा विद्यालय, महर्षी विद्यालय, माऊंट कारमेल स्कूल, कारमेल अकाडमी, चांदा पब्लिक स्कूल, महर्षी विद्यामंदिर, माऊंट हायस्कूल, केंद्रीय विद्यालय, दुर्गापूर, माऊंट फोर्ट ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर व बल्लारपूर स्कूल या शाळांनीही मागील वर्षीप्रमाणे शंभर टक्के निकाल दिला. यातील बारावी अभ्यासक्रमाच्या विद्यालयाचा बारावीतही निकाल १०० टक्के लागला होता. श्री महर्षी विद्यामंदिरची साक्षी देऊलवार हिने १० सीजीपीए रँक घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. नारायणा विद्यालयाची जागृती मोघे ही (१० सीजीपीए) द्वितीय आली आहे तर नारायणा विद्यालयाचाच संदेश गीरडकर हा (१० सीजीपीए) तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
शैक्षणिक भवितव्यातील दहावीचा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. सर्वच विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
श्री महर्षी विद्यामंदिरातील २३ विद्यार्थ्यांना ए१, तसेच २३ विद्यार्थ्यांना ए२ ग्रेड प्राप्त झाली आहे. याच शाळेची जान्हवी त्रिपूरवार, सिध्देश टोंगे यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. चांदा पब्लिक स्कूलचा समीर मुद्दमवार, सेंट मेरी हायस्कूल दुर्गापूरचा रोहित गेडाम, संघपाल मेश्राम, दृष्टी सुंकटवार, रोहिणी सातपुते, श्रेया कामद यांनी प्रावीण्य मिळविले आहे. सेंट माईकल इंग्लिश स्कूल, चंद्रपूरचा समीर धोटे, हर्षदा गोटेफोडे, कशीश शेख व पल्लवी दुधलकर यांनीही प्रावीण्य प्राप्त केले आहे.
इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक स्कूल राजुराची सबा पठाण (१० सीजीपीए), प्रज्ञेस किन्नाके व कार्तिक तुम्मावार यांनी घवघवीत यश मिळविले आहे. यासोबत ब्रह्मपुरी, चिमूर, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, राजुरा येथील सीबीएससी अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)