राज्य पातळीवर गाजलेल्या महिला क्रिकेट संघाचा सत्कार
By admin | Published: January 9, 2017 12:42 AM2017-01-09T00:42:48+5:302017-01-09T00:42:48+5:30
प्रतिकुल परिस्थितीमध्ये पुरेशा सुविधा नसतानासुद्धा भद्रावती सारख्या छोट्याशा शहरातील मुलींच्या क्रिकेट सघांने राज्य पातळीवर यश मिळवले ...
विलास निकम : महिला खेळांडूची उंच भरारी
भद्रावती : प्रतिकुल परिस्थितीमध्ये पुरेशा सुविधा नसतानासुद्धा भद्रावती सारख्या छोट्याशा शहरातील मुलींच्या क्रिकेट सघांने राज्य पातळीवर यश मिळवले व संघातील संजीवनी कावळे हीची राष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली, ही बाब भद्रावतीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे असे मत भद्रावतीचे ठाणेदार विलास निकम यांनी व्यक्त केले.
भद्रावती पोलीस ठाण्यात आयोजीत कार्यक्रमात मुलीच्या क्रिकेट संघाचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सदर सत्कार म्हणजे त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्याचा व त्याची पाठ थोपटून त्यांचे आत्मबल वाढविण्यासाठी असल्याचेही ठाणेदार निकम यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकात गुंडावार तर प्रमुख अतिथी म्हणून विकास उपगन्नावार, प्राचार्य गोपाल ठेंगणे, उपप्राचार्य अविनाश पामपट्टीवार, ठाणेदार विलास निकम, पोलीस उपनिरीक्षक मेघाली गावंडे, मनोहर पारधे,परसावार, सचिन सरपटवार आदी मान्यवर मंडळीची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी ठाणेदार विलास निकम यांच्या हस्ते लोकमान्य विद्यालय भद्रावतीच्या महिला क्रिकेट संघातील संजिवनी नंदलाल कावळे हीची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल या संघातील कर्णधार, जयश्री मडावी, दिक्षा देवगडे, भाग्यश्री खिराळे, अंजली गाडगे, नयन कोरडे, सायली झाडे, तनवी तुरारे, केतकी गंडाईत, साझी मेंढे, रेणुका सांडटे या १९ र्षाखालील यशस्वी मुलीच्या संघाचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून मोठ्या सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीसुद्धा मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीकरिता मुलीच्या संघाला शुभेच्छा दिल्या.या संघाचे प्रशिक्षक सचिन सरपटवार यांचा सुद्धा ठाणेदार निकम यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.(तालुका प्रतिनिधी)