स्वच्छतेसाठी महिलाही सरसावल्या
By admin | Published: October 3, 2016 12:50 AM2016-10-03T00:50:28+5:302016-10-03T00:50:28+5:30
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.
केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती : रस्त्याच्या दुतर्फा साफसफाई
चंद्रपूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचे औचित्य साधून चंद्रपूर शहरातील महिलांनी हातात झाडू घेऊन मातोश्री विद्यालय ते सुमीत्रनगर या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती केली. या मोहिमेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीरदेखील सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत भाजपा महिला आघाडीच्या तुकूम भागातील ३०० महिलांनी स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला. त्यामध्ये श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि वार्डातील नागरिकांनी सहकार्य केले. अभियानाचा समारोप तुकूम येथे करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना शामकुळे, राजेश मुन, भाजप नेते सुभाष कासनगोट्टूवार, अनिल फुलझेले, प्रमोद शास्त्रकार, रवी गुरनुले, अमिन शेख, वसंतराव धंदरे, बबनराव धर्मपुरीवार, वासुदेवराव सादमवार, विवेक कासलीकर आदी उपस्थित होते.
प्रमुख अतिथींच्या हस्ते रस्त्याची सफाई करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. अभियानाचे नेतृत्त्व भाजप महिला आघाडीच्या मंजुश्री कासनगोट्टूवार, मायाताई मांदाडे, शिलाताई चव्हाण, प्रज्ञाताई बोरगमवार यांनी केले.
स्वच्छता अभियानाची भूमिका मंजुश्री कासनगोट्टूवार यांनी मांडली. यावेळी संचालन कोसे व आभार वंदनाताई संतोषवार यांनी मानले. अभियान यशस्वी करण्यासाठी चंदाताई इटनकर, मोनिषा महावत, सिंधुताई चौधरी, रजनीताई बेसेकर, धर्मपुरीवार, पराये, ज्योती नामेवावर, प्रतिभा रोकडे, प्रविणा धारणे, राणी शेख, माधुरी घागी, वनिता आसूटकर, मेघा हरणे, मनिषा मामीडवार, कासलीकर, स्रेहल चिने, वीणा पाटील, फुलनदेवी देवतळे, सुवर्णा लोखंडे, भारती उपाध्ये, शिल्पा कांबळे, अलका दिकोंडवार आदींसह अनेक महिलांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
रॅलीत अवतरले गांधीजी
महिलांच्या स्वच्छता जनजागृती अभियानामध्ये एका वाहनावर गांधीजींची वेशभूषा करून एक चिमुकला बालक उभा होता. त्याच्या सोबत गाडगेबाबा, लोकमान्य टिळक, जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ आदींच्या वेशभूषा करून बालके सहभागी झाली होती. त्यांच्याकडे रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले जात होते.