चंद्रपूर जिल्ह्यात महिला असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:31 AM2021-03-01T04:31:53+5:302021-03-01T04:31:53+5:30

चंद्रपूर : ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू लागला आहे. मागील दोन वर्षात ...

Women insecure in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात महिला असुरक्षित

चंद्रपूर जिल्ह्यात महिला असुरक्षित

Next

चंद्रपूर : ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू लागला आहे. मागील दोन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात बलात्काराच्या २१० घटना घडल्याची पोलिसांकडे नोंद आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याने चिंता व्यक्त होत आहे. तर बऱ्याच प्रकरणामध्ये आप्तस्वकीयांनी बलात्कार केल्याची तक्रार आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील महिला असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

२१ व्या शतकात महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर पोहचल्या आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. मात्र आजच्या घडीला स्त्री ही ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही सुरक्षित नाही. रात्रीच्या वेळी कुठे एखादी मुलगी किंवा महिला आढळली तर तिची छेडछाड, विनयभंग, वाईट नजरांना सामोरे जावे लागत असल्याची घटना दर आठवड्याला कुठे ना कुठे तरी समोर येत असते. मुलींनी स्वसंरक्षण करण्यास शिकावे, समाजात वावरताना समोरच्या व्यक्तीला ओळखण्यास शिकावे, असा सल्ला अनेकांकडून देण्यात येतो. परंतु, आप्तस्वकीयांकडून अत्याचाराच्या घटना घडत असल्याने कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न आहे. अनेक नराधम कोवळ्या कळीलाही आपल्या वासनेचा शिकार बनवीत असल्याचे चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१९ मध्ये ९५ तर २०२० मध्ये ११५ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद घडली. त्यामुळे मुलींना ‘सातच्या आत घरात’ ही पालकांची किंवा आधुनिक समाजाची मनस्थिती नसून काळजी व भीती आहे.

बॉक्स

विनयभंगाच्या ४७७ तक्रारी

मागील दोन वर्षात जिल्ह्यात विनयभंगाच्या ४७७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सन २०१९ मध्ये २२७ तर २०२० मध्ये २५० तक्रारी दाखल झाल्या आहेत. दिवसेंदिवस या आकडेवारीत वाढ होत चालली आहे. त्यामुळे मुली व महिलांना घराबाहेर पडण्यास भीती वाटत आहे.

बॉक्स

बदनामीच्या भीतीने दडपली जाते तीव्रता

विनयभंग, छेडछाड, टाॅन्टिंग आदी प्रकारांना महिला व मुलींना सामोरे जावे लागते. मात्र बदनामी होईल या भीतीने महिला तक्रार देत नाही. मात्र त्यामुळे अशा नराधमाची हिंमत वाढत जाते. त्यामुळे अशा घटना वाढत आहेत. अशा नराधमांना शिक्षा देण्यासाठी महिलांनी स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Web Title: Women insecure in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.