अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध सरसावल्या खांबाडा येथील महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:33 AM2021-08-18T04:33:55+5:302021-08-18T04:33:55+5:30

खांबाडा या गावात मागील अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. मागील महिन्यात महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी ...

Women from Khambada take action against illegal liquor dealers | अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध सरसावल्या खांबाडा येथील महिला

अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध सरसावल्या खांबाडा येथील महिला

googlenewsNext

खांबाडा या गावात मागील अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. मागील महिन्यात महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविली. दारूची दुकाने सुरू होऊन सर्रास दारू मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अवैध दारू विकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. खांबाडा येथे अनेक दारू विक्रेते तयार झाले आहेत. दारूचा महापूर सुरू आहे. गावातील तळीराम मस्त दारूवर पैसे उडवीत कुटुंबाचा नाश करीत आहेत. दारूच्या व्यसनासाठी घरातील अन्नधान्य विकून हौस पूर्ण करीत आहेत. घराघरात भांडणे सुरू झाली आहेत. चौकात झगडे होऊ लागले आहेत. तरुण युवक व्यसनाधीन होत आहेत. शाळेतील मुलांना दारू आणण्यासाठी कामाला लावले जात आहे. स्त्रियांना तळीराम हेतूपूर्वक टोमणे मारीत अपमान करीत आहेत, अशी भीषण परिस्थिती गावात निर्माण झाली आहे. शाहिद स्मृतिदिनी १६ ऑगस्टला गावातील सर्व महिला तसेच तरुण, नागरिकांनी अवैध दारू विक्री बंद करणे व अवैध दारू विक्रेत्यांना गावातून हद्दपार करण्यासाठी खांबाडा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले.

गावकऱ्यांचा कडक निर्णय

दि. १५ ऑगस्टला हनुमान मंदिरात गावकऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात येऊन सर्वानुमते अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुठल्याही अवैध विक्रेत्याला गावाच्या आजूबाजूला कुठलेही नशा आणणारे पदार्थ विकता येणार नाही. असे आढळल्यास ग्रामसमिती त्यांच्यावर कारवाई करेल. जर ग्रामपंचायत किंवा ग्रामसमितीने कारवाई केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.

170821\img-20210817-wa0188.jpg

उपसरपंच यांना निवेदन देताना खांबडा येथील महिला

Web Title: Women from Khambada take action against illegal liquor dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.