दारुविक्री विरोधात महिलांची ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:28 AM2019-05-05T00:28:52+5:302019-05-05T00:29:15+5:30
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथे सर्रास दारूविक्री सुरु आहे. परिणामी गावातील महिला त्रस्त झाल्या. त्यामुळे दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, यासाठी महिलांनी पोलीस ठाणे गाठून गावात दारुबंदी करावी, अशी मागणी करीत शिष्टमंडळातर्फे निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथे सर्रास दारूविक्री सुरु आहे. परिणामी गावातील महिला त्रस्त झाल्या. त्यामुळे दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, यासाठी महिलांनी पोलीस ठाणे गाठून गावात दारुबंदी करावी, अशी मागणी करीत शिष्टमंडळातर्फे निवेदन दिले.
चंद्रपूर जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी दारुबंदी झाली. मात्र ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथे अवैध दारुविक्री सुरु आहे. त्यामुळे अनेक संस्कार उघडयावर पडले आहेत. त्यामुळे दारुविक्रेत्यांना पकडून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, पं. स. चे माजी सभापती नेताजी मेश्राम, तळोधी खुर्दच्या सरपंच व दारुबंदी महिला मंडळाच्या वतीने ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.