महिलांनी योद्धा बनून प्रत्येक गाव कोरोनामुक्त करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:35 AM2021-07-07T04:35:01+5:302021-07-07T04:35:01+5:30

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूरतर्फे नाबार्ड पुरस्कृत वित्तीय व डिजिटल साक्षरता शिबिरांतर्गत महिला बचतगट कर्ज वितरण व ...

Women should become warriors and liberate every village | महिलांनी योद्धा बनून प्रत्येक गाव कोरोनामुक्त करावे

महिलांनी योद्धा बनून प्रत्येक गाव कोरोनामुक्त करावे

Next

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूरतर्फे नाबार्ड पुरस्कृत वित्तीय व डिजिटल साक्षरता शिबिरांतर्गत महिला बचतगट कर्ज वितरण व मार्गदर्शन मेळावा माजरी येथील वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवनात पार पडला. शिंदे म्हणाले, कोरोनाच्या काळात आरोग्यसेवक म्हणून काम करीत आहो, त्यामुळे ग्रामीण भागात कोणालाही जमेल ती मदत नक्की करेन.

कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक नंदाताई अल्लूरवार, सामाजिक कार्यकर्ता वसंता मानकर, मानद सचिव श्यामसुंदर पोडे, रवि रॉय, कान्होबा तिखट, हेमंत महातळे, भारत मांढरे, कालिदास उपरे, नामदेव डाहूले, फकरू ताजने, विठ्ठल येरेकर, कपिल रांगणकर, पैकाजी खंगार, गेडाम, गाटकीने, वडगावकर, पवार जोगी, मोहीतकर, राकेश मत्ते उपस्थित होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, सरस्वती महिला बचत गट, कोंढा, सावित्रीबाई महिला बचत गट, कोंढा, सोनिया महिला बचत गट, पळसगाव, राधाकृष्ण महिला बचत गट, पळसगाव, मुक्ता महिला बचत गट, पळसगाव, रेणुका महिला बचत गट, कोंढा, आदर्श महिला बचत गट, कोंढा, संजीवनी महिला बचत गट, माजरी, साई महिला बचत गट, कोंढा, मातोश्री महिला बचत गट, कोंढा, उमेद महिला बचत गट, कोंढा या ११ बचतगटांना २० लाखांचे कर्ज वितरीत करण्यात आले. मेळाव्याला महिला व नागरिक उपस्थित होते.

060721\img-20210705-wa0066.jpg

महिलांनी कोरोना योध्दा बणून कोरोना मुक्त प्रत्येक गाव करावे : रवि शिंदे

महिला बचतगट कर्ज वितरण व मार्गदर्शन मेळावा संपन्न

Web Title: Women should become warriors and liberate every village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.