महिलांनी मतदानासाठी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:33 AM2019-03-15T00:33:13+5:302019-03-15T00:33:48+5:30

घराला, राष्ट्राला वळण लावण्याची निसर्गदत्त देणगी महिलांना मिळाली आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान किती आवश्यक आहे, हे समाजाला पटवून देण्यासाठी महिलांनी मतदान जनजागृतीमध्ये पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.

Women should come forward for voting | महिलांनी मतदानासाठी पुढे यावे

महिलांनी मतदानासाठी पुढे यावे

Next
ठळक मुद्देखेमनार : मतदान जनजागृती अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घराला, राष्ट्राला वळण लावण्याची निसर्गदत्त देणगी महिलांना मिळाली आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान किती आवश्यक आहे, हे समाजाला पटवून देण्यासाठी महिलांनी मतदान जनजागृतीमध्ये पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बालकल्याण अधिकारी आणि तहसील कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता विशेष मतदार नोंदणीचा कार्यक्रम कामगार भवन जिल्हा स्टेडियमजवळ घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी खेमनार पुढे म्हणाले, महिला या अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून समाजाकडे बघत असतात. भारतामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी पारदर्शी व सार्वत्रिक सहभागाच्या मतदानाची आवश्यकता आहे. त्यामुळे या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या वर्षा जामदार, महिला बालकल्याण समितीच्या सदस्य मनीषा नखाते, पोलीस सहाय्यक निरीक्षक एकरे आदी उपस्थित होते.
यावेळी मतदार जागृती अभियान बाबतची माहिती तहसीलदार रवींद्र माने यांनी दिली. यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, पाककलाचे आयोजन केले होते. तसेच याठिकाणी महिलांकरिता ईव्हीएम आणि व्हीव्ही पटची माहिती देखील देण्यात आली. महिलांसाठी मतदार नोंदणी करिता एका विशेष नोंदणी अधिकाऱ्याची नियुक्ती करून अर्ज क्रमांक ६ चे वितरण देखील करण्यात आले. यावेळी काही महिलांच्या नावांची नोंदणी देखील नवमतदार म्हणून करण्यात आली. प्रास्ताविक अर्पणा कोल्हे, संचालन प्रिया पिंपळशेंडे तर आभार बोरीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी साक्षी कार्लेकर, संजय राईंचवार उपस्थित होते.

Web Title: Women should come forward for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.