महिलांना अधिकाराबरोबरच सन्मान मिळावा!

By admin | Published: March 8, 2017 12:50 AM2017-03-08T00:50:05+5:302017-03-08T00:50:05+5:30

त्रीयांवरील होणारे शारिरीक व मानसिक अत्याचार संपुष्टात येण्यासाठी स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व समाजाची मानसिकता बदलली पाहिजे.

Women should get honor along with rights! | महिलांना अधिकाराबरोबरच सन्मान मिळावा!

महिलांना अधिकाराबरोबरच सन्मान मिळावा!

Next

विजया बांगडे : महिला लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमावर कार्यशाळा
गडचांदूर: स्त्रीयांवरील होणारे शारिरीक व मानसिक अत्याचार संपुष्टात येण्यासाठी स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार असला पाहिजे. त्यासाठी समाजाकडून भरपूर प्रयत्न होणे गरजेचे आहे. तेव्हाच समाजात स्त्रियांना अधिकाराबरोबरच सन्मान मिळेल, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या अ‍ॅड. विजया बांगडे यांनी केले.
राज्य महिला आयोग व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या निर्देशानुसार शरदराव पवार महाविद्यालयात ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१३’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेचे उद्घाटन अ‍ॅड. विजया बांगडे यांचे हस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून अल्ट्राटेक सिमेंटच्या सोनाली गवारगुर, तुळशिराम पुंजेकर, प्राचार्य रेणुका झंझाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह, प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, प्रा. डॉ. सुनील बिडवाईक, प्रा. डॉ.संजय गोरे, प्रा. डॉ. शरद बेलोरकर, प्रा. डॉ. सतेंद्र सिंह, शशांक नामेवार, आनंद नळे आदी उपस्थित होते.
सोनाली गवारगुर यांनी महिलांनी आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य सक्षमपणे पार पाडण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले यांनी महिला स्वत:चे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचे लक्षात घेतले पाहिजे, असे सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह यांनी केले. संचालन महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष प्रा. डॉ. माया मसराम यांनी केले तर आभार समितीच्या सदस्या प्रा. अनिषा डोहे यांनी मानले. परिचय प्रा. ऊजमा खान यांनी करुन दिला.
याप्रसंगी अ‍ॅड. विजया बांगडे व सोनाली गवारगुरू यांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासठाी प्रा. मंगेश करंबे, प्रिया मालेकर, शुभांगी बावणे, सोनाली मोहुर्ले, रमेश गोवर, सुभाष टेकाम, धर्मराज पोहाणे, सुरेश चांदेकर शशिकांत ढोकणे, कपील गोहणे, शंकर दाते, हरिश्चंद्र पोटे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Women should get honor along with rights!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.