महिलांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:14 PM2017-09-25T23:14:31+5:302017-09-25T23:14:49+5:30
महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांद्या लाऊन त्या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांद्या लाऊन त्या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन जेसीआयतर्फे करण्यात आले आहे. अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन जेसीआयच्या अध्यक्ष प्रा. डॉ. राजश्री मार्कंडेवार यांनी केले.
जेसीआय चंद्रपूर गरिमाद्वारा आयोजित ‘शॉप अण्ड सर्व’ या प्रदर्शनीमध्ये त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटनाप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना नील थुबे, रेनायसन्स पॉलिटेक्निकचे नितीन पुगलिया, तपस्या सराफ, जेसीआयच्या अध्यक्ष डॉ. राजश्री अजय मार्कंडेवार, सचिव गिता प्रवीण पाटील, रोशनी पुगलीया, माजी अध्यक्ष निलम डावर, एकता लोढा, सारिका पुगलिया, अनु बांठिया, शोभना बांठिया आदी उपस्थित होते.
या प्रसंगी स्वीकार मतिमंद मुला-मुलींची शाळा, धीरजग्राम, मोरवा येथील विद्यार्थ्यांना बेडशीट, चादर, पुस्तक, स्टेशनरी, मच्छरदानी, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य तसेच जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी कल्पना थुबे यांनी रेनायसन्स पॉलिटेक्निकचे नितिन पुगलिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रदर्शनात कपडे, दागिने, गृहसजावटीचे सामान, चॉकलेट पदार्थ, पेंटींग्स, शरबत आदी सामानाचे स्टॉल उभारण्यात आले होते. या प्रदर्शनाला भेट देणाºयांपैकी लकी विजेत्यांना कुंवर टिकमचंद ज्वेलसतर्फे बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी दैनंदिन मदतीस येणाºयांचे दूरध्वनी क्रमांक असलेल्या डायरीचे विमोचन डॉ. भारती मुंधडा आणि डॉ. ऋजुता मुंधडा यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन एकता लाढा, अनु बांठिया आणि शिल्पा गुप्ता यांनी केले. आभार सचिव गिता पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिल्पा कांस्टिया, शितल लोहिया, नीता कोठारी, हेमा राजा, सारिका गांधी, निशा मुरारका, पुनम मस्के, मोनिका जैन, शिल्पा गुप्ता, प्रिती जानी, शितल पडगेलवार, कविता उमाटे, निधी टंडन, अश्र्वीनी मुत्तावार यांच्यासह जेसीआय गरीमाच्या सदस्यांनी प्रयत्न केले.