महिलांनी अन्यायाचा प्रतिकार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:43 PM2018-03-14T23:43:53+5:302018-03-14T23:43:53+5:30
महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. मात्र, कायद्याच्या ज्ञानाअभावी अन्यायाविरुद्ध दाद मागण्यास महिला घाबरतात. त्यामुळे अन्याय सहन न करता कायद्याचा आधार घेवून महिलांनी प्रतीकार करावा, असे मत सहायक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
वरोरा : महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. मात्र, कायद्याच्या ज्ञानाअभावी अन्यायाविरुद्ध दाद मागण्यास महिला घाबरतात. त्यामुळे अन्याय सहन न करता कायद्याचा आधार घेवून महिलांनी प्रतीकार करावा, असे मत सहायक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांनी केले. वरोरा पोलीस ठाणे व प्रगती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या जागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. कृषी सभापती अर्चना जीवतोडे, जि.प. सदस्य सुनंदा जीवतोडे, नगसेवक सुनीता काकडे, मंगला पिंपळकर, आगलावे व अन्य मान्यवर उपस्ति होते. यावेळी विविध शेत्रामध्ये उत्कृष्ठरित्या कामगिरी बजावणाऱ्या महिलांना तसेच महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाच्या सदस्याचांसुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित लहान मुली, मुले तसेच महिलांनी नाटक संगीत व कीर्तनाच्या माध्यमातून स्त्रीभ्रूणहत्या, हागणदारी मूक्त गाव आणि हुंडाबळी अशा विविध विषयांवर समाजप्रबोधन केले. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी महिलांच्या हितासाठी पोलीस विभागाने तयार केलेल्या दामिनी पथकाची माहिती देवून त्यांच्या कार्याच्या स्वरुपाबद्दल मार्गदर्शन केले. जि. प. सभापती जीवतोडे म्हणाल्या, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महिलांनी धाडसाने पुढे येणे काळाची गरज आहे. देशाचा विकास व्हायचा असेल, तर महिलांना समानतेने वागविण्याची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. राजकीय क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे. मात्र, आरक्षणामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. संविधानाच्या तरतुदींचा आधार घेवून प्रत्येक क्षेत्रात पुढे राहावे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात सहभागी महिलांनी आजचे बदलते वर्तमान आणि महिलांच्या समस्या आदी पैलुंवर विचार मांडले. मूलभूत समस्या व विविध विषयांवर चर्चा करून एकमेकांशी संवाद साधला. प्रास्ताविक योगिता लांडगे, संचालन उज्वला पोहीनकर यांनी केले. आभार वैशाली वराटे यांनी मानले. यावेळी योगिता लांडगे , भावना रंगारी , अर्चना टोंगे , खुशबू पाल, दिपकांता लभाने आदी उपस्थित होते.