महिलांनो, अन्यायाविरुद्ध पेटून उठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:53 PM2017-11-08T23:53:19+5:302017-11-08T23:53:43+5:30
महिलांवरील अन्यायाविरूध्द सर्व महिलांनी पक्ष, जात आणि धर्माचा विचार बाजूला सारुन पेटून उठावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री शोभाताई फ डणवीस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: महिलांवरील अन्यायाविरूध्द सर्व महिलांनी पक्ष, जात आणि धर्माचा विचार बाजूला सारुन पेटून उठावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री शोभाताई फ डणवीस यांनी केले. डॉ. जया द्वादशीवार स्मृतीप्रीत्यर्थ संयुक्त महिला मंचाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
महापौर अंजली घोटेकर यांनी रौप्य महोत्सवाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्याध्यक्ष विमल गाडेकर तर मंचावर डॉ. रजनी हजारे, डॉ. रेखा दांडेकर, उषा बुक्कावार व अन्य मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रांत कार्य करणाºया कार्यकर्त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी चंद्रपूरची हिरकणी या माहिती पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांनी केले.
शिवाय सर्व हिरकणींचा शाल, श्रीफ ळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उषा बुक्कावार म्हणाल्या, गुणांची बेरीज व अवगुणांची वजाबाकी केली तर जीवनात प्रगती साधता येते. डॉ. रजनी हजारे यांनी प्रत्येक सेवा महत्वाची असून छोट्या छोट्या मदतीच्या रूपानेही समाजसेवा साधता येते. सांगीतले. डॉ. दांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी स्व. जया द्वादशीवार यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. विमल गाडेकर म्हणाल्या, संयुक्त महिला मंचाची स्थापना करून सर्वच जाती, धर्म आणि पक्षाच्या महिलांना एकत्र आणण्यात आले. यातून संयुक्त महिला मंच आकारात आले. कार्यक्रमानिमित्त नृत्य, गायन, भाषण तसेच एकपात्री प्रयोग स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारासाठी ललिता बेहरम, डॉ. प्रतिभा खोब्रागडे वर्षा कोडापे आदींनी सहकार्य केले. रोख रक्कम आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. परीक्षक म्हणून कुलचंद्र खोब्रागडे व भगवान गाडेकर यांनी काम केले. संचालन मंदा पडवेकर व मोना कांबळे आणि प्रास्ताविक डॉ. प्रतिभा खोब्रागडे यांनी केले. संगीता येरमे यांनी नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली.
इंदुमती पाटील, ज्योती जीवने, शकुंतला वरभे, सत्यफु ला रायपूरे तसेच संयुक्त महिला मंच कार्यकर्त्या व पदाधिकाºयांनी सहकार्य केले.