पाण्यासाठी महिलांचा नगरपालिकेसमोर संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:33+5:302021-06-01T04:21:33+5:30
घुग्घुस ग्रामपंचायतचे रूपांतर या नवीन वर्षात नगर परिषदमध्ये झाले. पाच महिने झाले असले तरी कायमस्वरूपी प्रशासक मिळाले नाही. तात्पुरत्या ...
घुग्घुस ग्रामपंचायतचे रूपांतर या नवीन वर्षात नगर परिषदमध्ये झाले. पाच महिने झाले असले तरी कायमस्वरूपी प्रशासक मिळाले नाही. तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा, विद्युत, बांधकाम, प्रशासन व आरोग्य विभागासाठी एका प्रमुखाची तात्पुरती नियुक्ती करून नगर परिषदेचा कारभार सुरू आहे. यापूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना बाराही महिने पाणीपुरवठा होईल, यासाठी ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे विशेषतः उन्हाळ्यात पाणी टंचाईने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
येथील बहिरमबाबा नगर वाॅर्ड क्र ६ मध्ये महिला पाणी टंचाईने त्रस्त झाल्या आणि अचानक नगर परिषद गाठून पाणी टंचाईबाबत आक्रोश व्यक्त केला. दरम्यान पाईपलाईनची दुरुस्ती करून नळधारकांना नळ योजनेच्या माध्यमातून नियमित पिण्याच्या पाण्याचा बंदोबस्त करावा, यासाठी एक निवेदन देऊन पाणीपुरवठा करण्याची विनंती केली. नगर परिषदेकडून पाणी टँकरने पाणीपुरवठा व नळाच्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त महिला माघारी परतल्या. यावेळी निवेदन देताना सुशीला बरडे, शारदा भरणे, अंजली ठाकरे, किरण रंगारी, नूतन पडवेकर, सुजाता रंगारी, रमाबाई पडवेकर, माधुरी भोंगळे, वंदना तिवारी, नीलिमा निचकोला, ममता रईदास, अनिल बोबडे व मधुकर धांडे उपस्थित होते.
===Photopath===
310521\img_20210531_173648.jpg
===Caption===
संताप व्यक्त करताना महिला