राष्ट्रसेविका समितीतर्फे महिलांचा दसरा उत्सव

By admin | Published: October 22, 2015 12:50 AM2015-10-22T00:50:52+5:302015-10-22T00:50:52+5:30

राष्ट्रसेविका समिती नगर शाखा नवरगावच्या वतीने शस्त्रपूजन व दसरा उत्सव मोठ्या उत्साहात भारत विद्यालयाच्या पटांगणावर साजरा झाला.

Women's Dussehra celebration by the National Service Committee | राष्ट्रसेविका समितीतर्फे महिलांचा दसरा उत्सव

राष्ट्रसेविका समितीतर्फे महिलांचा दसरा उत्सव

Next

नवरगाव : राष्ट्रसेविका समिती नगर शाखा नवरगावच्या वतीने शस्त्रपूजन व दसरा उत्सव मोठ्या उत्साहात भारत विद्यालयाच्या पटांगणावर साजरा झाला.
सदर महिलांच्या दसरा उत्सवाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरपंच अनिता गायकवाड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रतिभा नानोटी, मृणाल बोरकर आदी मंचावर उपस्थित होते. जयंत बोरकर यांच्या वाड्यातून राष्ट्रसेविका समितीची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने निघाली. कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते शस्त्राचे व प्रतीमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रतिभा नानोटी म्हणाल्या, चांगल्या कामाची सुरूवात या दिवशी केली जात असून विजय दिवस म्हणून महत्त्व आहे. राष्ट्रसेविका समिती विकासाच्या कार्याने प्रेरीत झाली असून हिंदू म्हणून या देशात रामराज्य आणायचे आहे. आतंकवाद, पराभव ही भावना नष्ट झाली पाहीजे. ८० वर्षांपासून ही समिती कार्यरत असून स्त्री शक्ती, एकत्र काम करण्याची प्रवृत्ती, राष्ट्रीय एकात्मता शिकवित असून संस्कृतीचे जतन केले पाहिजे. आपण तेजस्वी भारताचे नागरिक असून निसर्गाप्रमाणे आपणातही चांगले गूण आहेत ते ओळखण्याची गरज आहे. हे चांगले गुण समाजापर्यंत पोहचविण्याचे आवाहन यावेळी केले. राष्ट्रसेविका समितीच्या सदस्यांनी विविध योग सादर केले. वैयक्तीक गीत सुनंदा बाकरे, श्लोक नंदनवार यांनी सादर केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून नवरगाव येथील सैथिक कुंभरे यांना गडचिरोली येथे विरमरण आले, त्यांच्या मातेचा सत्कार करण्यात आला. तसेच येथील दोन व्यक्ती सैन्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याही मातांचा सत्कार करण्यात आला. संचालन नंदनवार यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Women's Dussehra celebration by the National Service Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.