दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 10:09 PM2018-11-10T22:09:40+5:302018-11-10T22:10:11+5:30

आमडी (बे.) येथील दारूविक्री बंद करण्यासाठी महिलांनी विशेष ग्रामसभा घेऊन बंदीसाठी ठराव पारीत केला.

Women's Elgar Against Alcoholism | दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार

दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार

Next
ठळक मुद्देआमडी (बे.) येथील घटना : दारुबंदीकरिता विशेष ग्रामसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : आमडी (बे.) येथील दारूविक्री बंद करण्यासाठी महिलांनी विशेष ग्रामसभा घेऊन बंदीसाठी ठराव पारीत केला.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील १५०० लोकसंख्या असलेल्या आमडी (बे.) येथे अनेक दारूविक्रेते तयार झाले आहेत. अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी गेले. त्यामुळे महिलांच्या आग्रहास्तव दारूबंदीकरिता जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात शनिवारी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी रुखमा विठ्ठल डंभारे तर सरपंच वामन गुडदे, उपसरपंच विजू झाडे, ग्रा. पं. सदस्य कोमल पांडे, शोभा डुकसे, अर्चना गराटे, अनु खांडेकर, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल डरे, ग्रामसेवक एकुडे, चिमूरचे ठाणेदार प्रमोद मडामे उपस्थित होते. विशेष ग्रामसभेला दीडशेपेक्षा अधिक महिलांची उपस्थिती होती. महिलांनी गावातील अवैध दारूविक्रेत्यांविरोधात रोष व्यक्त करून दारूविक्री बंद करण्याबाबत एकमताने ठराव घेतला आहे. युवक मंडळी, ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समिती व ग्रामस्थांनी ठरावाचे समर्थन केले.
वहानगावाचे स्मरण
दारूविक्रीला कंटाळून एका वर्षापूर्वी परिसरातील वहानगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेतला. याकरिता ग्रामपंचायतने दारूविक्री करण्याकरिता नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. ग्रामपंचायत इमारतीला देशी-विदेशी दारूचे दुकान असा फलक लावला होता.
खडसंगीत पोलीस चौकी सुरू करा
वहानगाव प्रकरणानंतर खडसंगी येथील पोलीस चौकी पोलीस विभागाने सुरू केली होती. अवैध दारूविक्रीला आळा बसला होता. पण आठ महिन्यांपासून पोलीस चौकी बंद आहे.

Web Title: Women's Elgar Against Alcoholism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.