अवैध दारूविक्री विरोधात महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:26 PM2018-03-08T23:26:17+5:302018-03-08T23:26:17+5:30
वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या तिनही जिल्हात दारूबंदी आहे. मात्र प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने छुप्या मार्गाने अवैधदारू विक्री सुरु आहे. या तिनही जिल्हात दारूबंदीची प्रभावी अंमलबाजवणी करावी, अशा मागणीचे निवेदन गुरूवारी येथील महिलांनी वरोरा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.
आॅनलाईन लोकमत
वरोरा : वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या तिनही जिल्हात दारूबंदी आहे. मात्र प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने छुप्या मार्गाने अवैधदारू विक्री सुरु आहे. या तिनही जिल्हात दारूबंदीची प्रभावी अंमलबाजवणी करावी, अशा मागणीचे निवेदन गुरूवारी येथील महिलांनी वरोरा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.
दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कायद्यात बदल करावे, स्वतंत्र पोलीस दल, लोकसहभागासाठी समिती गठण करणे, व्यसनमुक्ती केंद्रासाठी आरोग्य विभागात स्वतंत्र कक्ष निर्माण करावे, अट्टल विक्रेत्यांवर एमपीडीएनुसार कारवाई करावी, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महिला दिनाचे औचित्य साधून असंख्य महिलांनी एल्गार पुकारत निवेदन दिल्याने प्रशासनाने दखल घेण्याची मागणी आहे.