पाण्यासाठी महिलांचा नगर पंचायतवर घागर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:55 AM2019-08-28T00:55:42+5:302019-08-28T00:56:22+5:30
कार्यालयासमोर घागरी फोडून नगरपरिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा महिलांनी निषेध केला. मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले. नळाला पाणी येत नसल्याने बिल रद्द करावे, पाणी पुरवठा न करणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, नियोजनशुन्य पाईपलाईनची दुरूस्ती करावी, नळ योजनेमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : सहा महिन्यांपासून शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महिलांनी मंगळवारी नगरपंचायतवर घागर मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पन करून मोर्चाची सुरूवात झाली. गांधी चौकातून हा मोर्चा शिवाजी चौक मार्गे नगरपंचायतवर धडकला.
कार्यालयासमोर घागरी फोडून नगरपरिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा महिलांनी निषेध केला. मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले. नळाला पाणी येत नसल्याने बिल रद्द करावे, पाणी पुरवठा न करणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, नियोजनशुन्य पाईपलाईनची दुरूस्ती करावी, नळ योजनेमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली. प्रभाग क्रमांक ९ व १० मध्ये निकृष्ट बांधकाम करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. घागर मोर्चात नगरपंचायतचे गटनेता अतिक कुरेशी, नगरसेविका सविता गेडाम, शारदा नैताम, निता पद्मगिरीवार, लता दुधबळे, विमल धोडरे, मंगला बुरांडे, मुरलीधर टेकाम, अशोक गेडाम, जयपाल गेडाम, नगरसेवक अमर बघेल, नंदू बुरांडे व शेकडो महिला व पुरूष सहभागी झाले होते.