रेल्वे पुलासाठी महिलांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:55 PM2018-08-31T22:55:54+5:302018-08-31T22:56:13+5:30
मागील १८ महिन्यांपासून रखडलेल्या रेल्वे पुलाच्या कामाला हिरवी झेंडी मिळाली. परंतु हा पूल नवीन आराखड्यानुसार बांधण्यात येत आहे. याविरूद्ध शहरातील मर्दानी महिला आस्था मंचाने नगर परिषदेसमोर शुक्रवारी आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : मागील १८ महिन्यांपासून रखडलेल्या रेल्वे पुलाच्या कामाला हिरवी झेंडी मिळाली. परंतु हा पूल नवीन आराखड्यानुसार बांधण्यात येत आहे. याविरूद्ध शहरातील मर्दानी महिला आस्था मंचाने नगर परिषदेसमोर शुक्रवारी आंदोलन केले.
वस्ती विभाग डेपो-टेकडी विभागाला जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पूलाचे काम महिन्यापासून बंद होते. पूलाच्या कामाला नवीन आराखड्यानुसार सुरुवात होत आहे. परंतु हा नवीन मार्ग नागरिकांसाठी धोकादायक आहे. काही लोकांच्या स्वार्धासाठी आराखडा तयार करण्यात आला, असा आरोप मर्दानी महिला आस्था मंचाने केला आहे. हा पूल पूर्वी जसा होता त्याचप्रमाणे बनविण्यात यावा, या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी मुदधा यांना दिले. याप्रसंगी मेघा भाले, किरण दुधे, राधा साहू, स्मिता बुजोणे, अंबिका गोंदे, अल्का मोहितकर, अल्पना बुजोणे, सपना बोनगिरवार उपस्थित होते.