वंडरबॉय! अफाट स्मरणशक्तीचा कैवल्य अमोल भोयर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:51 PM2018-04-12T12:51:21+5:302018-04-12T12:53:40+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा या गावातील कैवल्य अमोल भोयर याला देशातील राज्यातील प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय खेळ, फुल, प्राणी, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी तोंडपाठ आहेत.

Wonderboy! Amol Bhoyar Kaavalya of immense memory | वंडरबॉय! अफाट स्मरणशक्तीचा कैवल्य अमोल भोयर

वंडरबॉय! अफाट स्मरणशक्तीचा कैवल्य अमोल भोयर

Next
ठळक मुद्देवय तीन वर्षांचे, स्मरणशक्ती मोठ्या माणसाचीचक्क ५ लाख लोकांनी दिली व्हिडिओला पसंती  

सतीश जमदाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तीन वर्षांचे वय हे खेळण्या-बागडण्याचे असते मात्र


लहान वयातच काही मुलांमध्ये असामान्य बुद्धिमत्तेची चुणूक दिसून येते. त्याची हुशारी भल्याभल्यांना थक्क करून सोडते. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा या गावात राहणाऱ्या कैवल्य अमोल भोयर या तीन वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या सामान्य ज्ञान आणि स्मरणशक्तीच्या जोरावर भल्याभल्यांना आश्चर्यचकित करून सर्वांच्या भुवया उंच करावयास भाग पाडले आहे.
जी वय मुलांची खेळायची असते अशा वयात कैवल्यची जनरल नॉलेजसोबत मैत्री आहे. कैवल्यला दररोज घडणाºया घटनांची व नवनवीन माहिती जाणून घ्यायची उत्सुकता असते. त्याचे आई-वडील देखील त्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात. कैवल्यचे वडील हे एका खाजगी कंपनीत कार्यरत आहेत, तसेच त्यांचा मोबाईल दुरुस्तीचे काम देखील आहे,व कैवल्यची आई वैशाली अमोल भोयर ह्या नांदा या गावच्या पोलीस पाटील आहेत. आई वडील या दोघांचाही दिनक्रम अतिशय व्यस्त असतांना देखील कैवल्यला वेळात वेळ काढून संपूर्ण जनरल नॉलेज सोबत घडणाºया रोजच्या नवीन घटनाची माहिती त्याला देत असतात. यात त्याला चित्राच्या माध्यमातून देखील ओळख करून दिली जाते. ज्यात त्याला माहिती जाणून घेण्यास मदत होते. सध्या कैवल्य शाळेत जात नसला तरी देखील तो लवकर प्रत्येक गोष्ट आत्मसाद करतो येणाऱ्या अभ्यास वर्षात त्याचा चांगल्या शाळेत प्रवेश देणार असल्याचे त्याच्या वडीलाने सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण सोशल मिडीयावर कैवल्याचा विडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. युटूबर नादखुळा या चॅनेलने कैवल्याच्या हा व्हिडीओ अपलोड केला असता त्याला ४ लाख ७२ हजार लोकांनी बघितले असून हजारो लाईक सोबत प्रशंसनीय कमेंट्ससुद्धा आहेत.यात त्याने तीन मिनिटात जवळजवळ ७५ प्रश्नांना न अडखळता उत्तरे दिली आहेत.

केवल्य दीड पावणेदोन वर्षांचा असतानाची गोष्ट आहे. तो नुकताच बोलायला लागला होता. त्याची आई स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होती. त्यावेळी तो शेजारी बसला असताना त्याला काही प्रश्न व त्याची उत्तरे सहजच सांगितली. ज्यात आपला जिल्हा, राज्य आदी माहिती होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा अभ्यासाला त्याची आई बसली असताना कैवल्यने आदल्या दिवशी सांगितलेली माहिती बिनचूकपणे आईला पुन्हा सांगितली. तेव्हा आम्हाला आश्चर्यच वाटले. त्याला मग दररोज नवनवी माहिती देत गेलो. त्यानेही ती तात्काळ आत्मसात केली. त्याला स्मरणशक्तीचे वरदान असल्याचे तेव्हाच आमच्या लक्षात आले. आम्ही त्याला टीव्ही जास्त पाहू देत नाही. काही महत्त्वाचे व माहितीपूर्ण कार्यक्रमच पाहू देतो.
वैशाली व अमोल भोयर (कैवल्यचे आईवडील)  

Web Title: Wonderboy! Amol Bhoyar Kaavalya of immense memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य