नागरिकांच्या अंत्यविधीसाठी भद्रावती नगरपालिकेकडून लाकडाचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:06 AM2019-04-19T00:06:53+5:302019-04-19T00:07:34+5:30
जीवन कितीही धकाधकीचे आणि संघर्षाचे गेले तरी आयुष्याचा शेवट गोड व्हावा, अशीच साऱ्यांची आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात अपेक्षा असते. परंतु, नशिबाचे भोग भोगताना अनेकांच्या वाट्याला एकटेपणा, निराश्रीत व गरिबीचे जीवन येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती: जीवन कितीही धकाधकीचे आणि संघर्षाचे गेले तरी आयुष्याचा शेवट गोड व्हावा, अशीच साऱ्यांची आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात अपेक्षा असते. परंतु, नशिबाचे भोग भोगताना अनेकांच्या वाट्याला एकटेपणा, निराश्रीत व गरिबीचे जीवन येतात. अशा गोरगरिबांच्या अंत्यसंस्कारासाठी येथील पोलिकेतर्फे अंत्यसंस्काराच्या साहित्यातील लाकडू दान देत मागील वर्षभरापासून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यामुळे समाजातील गोरगरीब, दारिद्र्यरेषेखालील परिवारांना शेवटच्याक्षणी का होईना, पालिका नाथ म्हणून उभी राहात असून, मागील वर्षभरात ५० कुटुंबाना ही मदत करण्यात आली आहे.
जगणं, मरणं एका श्वासाचं अंतर असल तरी आज पैसा, वैभव व प्रतिष्ठेच्या मागे जग धावताना दिसते. या आभासी जगात धडपडताना काहींना आपल्या सग्यासोयऱ्यांचाही विसर पडतो. इतकेच काय तर जन्मदात्या आईवडिलांनाही अनाथाश्रमाच्या पायºया चढाव्या लागतात. तर काहींना आयुष्यात अपघाताने एकटेपण येते. तेव्हा आयुष्यात केलेली धावपळ, मिळविलेले वैभव आणि संपती सारे निरर्थक ठरते. अशावेळी त्यांच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारीही दुसºयांच्या खांद्यावर येऊन पडते. अंत्यसंस्काराचे साहित्य खरेदी करायला आलेल्यांना पैसे मोजावे लागतात. त्यातही काहीवेळा तडजोड करण्याची वेळ येते. हीच परिस्थितीलक्षात घेत पालिका प्रशासनाने मागील एक वर्षापूर्वी ठराव घेवून अशा गोरगरिबाला अंत्यविधीसाठी मयतीच्या सामुग्रीत तीन मन लाकडी काड्या देवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा निर्णय घेतला.
शहरातील भद्रनागस्वामी देवस्थान परिसरातील शहराच्या मध्यभागी असलेल्या ताजुद्दीन टिंबर मार्ट यांच्याकडे सदर सामुग्री देण्याचे कंत्राट पोलिकेतर्फे देण्यात आले असून, गोरगरीब कुटुंब या पालिकेच्या उपक्रमाचा लाभ घेत आहे. पालिकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.