बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम निधीअभावी रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:07+5:30
शहरातील बाबूपेठ परिसरातून रेल्वेलाईन जाते. या मार्गावरून देशातील अनेक शहरात शेकडो रेल्वे जातात. उड्डाणपूल नसल्याने रेल्वे फाटकावर वाट पाहत थांबावे लागते. या रेल्वे मार्गावरून दर अर्ध्यातासाने एक रेल्वे जाते. त्यामुळे येथील फाटक नेहमीच बंद असते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हाडा कॉलनीला जोडणाºया इरई नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र बाबुपेठ उड्डाणपूल रेंगाळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील नागरिकांच्या रहदारीसाठी बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम विहित कालावधीत पूर्ण करणे गरजेचे होते. बांधकामाला चार वर्षांपूर्वीच मान्यता मिळाली. मात्र, निधीअभावी बांधकाम रखडल्याने दररोज शेकडो नागरिकांना रेल्वे फाटकावर ताटकळ राहावे लागत आहे.
शहरातील बाबूपेठ परिसरातून रेल्वेलाईन जाते. या मार्गावरून देशातील अनेक शहरात शेकडो रेल्वे जातात. उड्डाणपूल नसल्याने रेल्वे फाटकावर वाट पाहत थांबावे लागते. या रेल्वे मार्गावरून दर अर्ध्यातासाने एक रेल्वे जाते. त्यामुळे येथील फाटक नेहमीच बंद असते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हाडा कॉलनीला जोडणाºया इरई नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र बाबुपेठ उड्डाणपूल रेंगाळत आहे. २०१६ रोजी या पुलाला ३२.२२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकासह तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. राज्य शासन, रेल्वे आणि महानगर पालिका मिळून ३३.२२ कोटी रुपयांच्या खर्चाची विभागणी करण्यात आली. बांधकाम सुरु झाले. मात्र, पुलाच्या बांधकामात ९३ पक्की बांधकामे आडवी आली. परिणामी, पुनर्वसनाच्या प्रश्नावरून नागरिकांनी लढा उभारला. काही जण न्यायालयात गेले. त्यामुळे पुलाचे बांधकामाला विलंब होत आहे.
१० कोटी २६ कोटींची गरज
बाबूपेठ उड्डाणपूल बांधकामासाठी राज्य राज्याकडून १० कोटी २६ लाख आणि मनपाचे पाच कोटी असे एकूण १० कोटी २६ लाखांचा निधी अद्याप मिळाला नाही. त्यामुळे बांधकाम थंडावले आहे. या निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली. परंतु राज्य शासनाने निधी दिला नाही. कोरोनामुळे बांधकामावर ३० टक्के निखी खर्च करण्याचे आदेश राज्याच्या वित्त विभागाने जारी केले. त्यामुळे या उड्डाण पुलासाठी निधी मिळणार की नाही, हा प्रश्नच आहे. पुलाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. या प्रश्नावरून राजकारणही झाल्याचा इतिहास आहे.