तेंदूपान संकलनाचे कार्य जोमात सुरू

By Admin | Published: May 10, 2017 12:49 AM2017-05-10T00:49:34+5:302017-05-10T00:49:34+5:30

चंद्रपूर स्थित मध्यचांदा वन विभागातील सात वनपरिक्षेत्रामधील २२ तेंदूपाने घटकामध्ये तेंदूपाने संकलनाचे कार्य स्थानिक आदिवासी व इतर मजुरांकडून जोमात सुरू झाले आहे.

The work of collecting leopard collections continues | तेंदूपान संकलनाचे कार्य जोमात सुरू

तेंदूपान संकलनाचे कार्य जोमात सुरू

googlenewsNext

मध्यचांदा वन विभाग : संकलनकर्त्या मजुरांना सात कोटी मिळणार
आनंद भेंडे। लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : चंद्रपूर स्थित मध्यचांदा वन विभागातील सात वनपरिक्षेत्रामधील २२ तेंदूपाने घटकामध्ये तेंदूपाने संकलनाचे कार्य स्थानिक आदिवासी व इतर मजुरांकडून जोमात सुरू झाले आहे. त्यामध्ये संकलनकर्त्या मजुरांना मजुरीपोटी सात कोटी रुपये मिळणार असून मजुरांची आर्थिक स्थिती बळकट होणार आहे.
वन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, यावर्षी तेंदूपाने घटकास कंत्राटदारांनी निर्धारित रक्कमेपेक्षा जास्त रक्कम देवून घटक खरेदी केले आहे. मध्यचांदा वन विभाग चंद्रपूरमधील बल्लारशाह, कोठारी, धाबा, राजुरा, वनसडी, जिवती, विरूर या वनपरिक्षेत्रातील २२ तेंदूपाने घटकातून ३३ हजार ६५७ प्रमाण गोणीचे संकलन करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. तेंदूपाने गोळा करण्याचा दर १८५ रुपये प्रती प्रमाण गोणी आहे. त्यामुळे या वन विभागातील गोरगरीब आदिवासी व इतर मजुरांना काम उपलब्ध होवून कंत्राटदारामार्फत मजुरीपोटी सात कोटी रुपयांचे वाटप होणार आहे.
तेंदूपाने गोळा करण्यासाठी शहर व खेड्यातील मजूर पहाटेला उठून जंगलात जातात. सकाळी १० वाजेपर्यंत पाने गोळा करून घरी येतात त्यानंतर घरातील सर्व लहान मोठी मंडळी एकत्र येवून ७० पानाचे पुडे तयार करतात. ती पाने कंत्राटदाराला देण्यात येतात. या कामात मोठी नगदी रक्कम मिळत असल्यामुळे घरची मंडळी सहभागी होतात. तसेच नातेवाईक सुद्धा येवून यात मदत करतात.
तेंदूपाने नैसर्गिक उपज असल्यामुळे यावर वन विभागास कोणताही खर्च करावा लागत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने गोरगरीब नागरिकांचा फायदा लक्षात घेवून तेंदूपाने घटक लिलावातून मिळणाऱ्या रक्कमेतून अंदाजे ६० टक्के रक्कम बोनस रूपात वाटप केली जाते. त्यामुळे मजुरांना मोबदला व बोनस रक्कम मिळत असल्यामुळे घरची मंडळी या हंगामाकडे आकर्षित होतात. मजुरांना या रक्कमेतून पुढील लग्न, शेती व शिक्षणाचा खर्च व इतर कामासाठी आर्थिक मदत होत असते. त्यामुळे या तेंदू हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले असते. यावर्षी मजुरांना मजुरीपोटी ७ कोटी व बोनस म्हणून अंदाजे ६ कोटी असे एकून १३ कोटी रुपये मिळणार असल्यामुळे त्यांची वर्षभराची पुरणपोळीची शिदोरी म्हणून संबोधिल्या जाते. मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांच्या मार्गदर्शनात वनाधिकारी व कर्मचारी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे.

मध्यचांदा वन विभागातील २२ तेंदूपाने घटकातून ३३ हजार ६७५ प्रमाण गोणी संकलन करावयाचे आहे. त्यापोटी मजुरांना मजुरीपोटी सात कोटी रुपये मिळणार आहे. त्यामुळे या वन विभागातील मजुरांची आर्थिक स्थिती बळकत होणार आहे.
- गजेंद्र हिरे
उपवनसंरक्षक, मध्य चांदा
वनविभाग चंद्रपूर

Web Title: The work of collecting leopard collections continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.