जांभुळघाट आरोग्य केंद्रातील कर्मचारी करतात दहशतीत काम

By admin | Published: November 10, 2016 02:05 AM2016-11-10T02:05:22+5:302016-11-10T02:05:22+5:30

चिमूर तालुक्यातील जांभुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध विभागात कार्यरत असलेले कर्मचारी अशोक पांढरे हे उपचारासाठी

Work done in Jambulghat Health Center | जांभुळघाट आरोग्य केंद्रातील कर्मचारी करतात दहशतीत काम

जांभुळघाट आरोग्य केंद्रातील कर्मचारी करतात दहशतीत काम

Next

केवलसिंह जुनि : कारवाई करण्याची मागणी
चिमूर : चिमूर तालुक्यातील जांभुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध विभागात कार्यरत असलेले कर्मचारी अशोक पांढरे हे उपचारासाठी आलेल्या रुग्णांसोबत असभ्य वर्तणूक करतात. तसेच आपल्या कार्यात कसूर करतात. व सहकारी महिला कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देतात. तसेच आपल्या सहायक कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याची भिती दाखवतात. त्यामुळे आरोग्य केंद्रातील महिला, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यात दहशत पसरली आहे. याचा परिणाम रुग्णांवर होत आहे. त्यामुळे सहकर्मचाऱ्यात दहशत निर्माण करून रुग्णांसोबत असभ्य वर्तन करणारा औषध निर्माता अशोक पांढरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख केवलसिंह जुनि व गावकऱ्यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या गावाजवळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. चिमूर पासून १२ किमी अंतरावर असलेल्या जांभुळघाट येथे शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. या आरोग्य केंद्रात आंबेनेरी, कपली, पिंपळगाव, मालेवाडा, सावरगाव, पिंपळगाव, लोधरा अशा अनेक गावातील रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांलयात आलेले रुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून औषधीसाठी गेले असता त्यांच्यासोबत असभ्य वर्तन करून औषधी योग्य देत नसल्याच्या तक्रारी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी येथील शिवसेना उपतालुका प्रमुख केवलसिंह जुनि यांच्याकडे केली. या रुग्णाची तक्रारीची दखल घेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रात कार्यरत अशोक पांढरे यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी आरोग्य मंत्री, पालकमंत्री व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पांढरे यांच्यावर कारवाई न केल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारासुद्धा शिवसेना तालुका उपप्रमुख केवलसिंह जुनि यांनी दिलेला निवदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

कर्मचाऱ्यांच्या तक्रारीला केराची टोपली
औषध निर्माण अधिकारी अशोक पांढरे हे सहकर्मचाऱ्यासोबत उद्धटपणाने वागणूक करतात. तसेच माझ्या कार्यालयात कुणी यायचे नाही. मी तुमचा अधिकारी असल्याने मी तुमचे काहीही करू शकतो.तसेच आशा वर्करला सुद्धा अपमानास्पद वागणूक देतात. या आशयाची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांना वैद्यकीय अधिकारी जांभुळघाट यांच्यामार्फत १२ आॅगस्ट २०१६ ला दिली. मात्र या तक्रारीवर अजुनही कारवाई करण्यात आलेली नाही.

Web Title: Work done in Jambulghat Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.