गोविंदपूर- शिरपूर- नेरी या राज्य महामार्गाचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:37+5:302021-04-09T04:30:37+5:30
तालुक्यातील गोविंदपूर- शिरपूर -नेरी या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सद्यस्थितीत सुरू असल्याने जागोजागी मार्ग खोदून ठेवलेला आहे. त्यामुळे वाहन ...
तालुक्यातील गोविंदपूर- शिरपूर -नेरी या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सद्यस्थितीत सुरू असल्याने जागोजागी मार्ग खोदून ठेवलेला आहे. त्यामुळे वाहन चालवताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा येथे किरकोळ अपघातसुद्धा झाले आहेत. या बाबीला पाच ते सहा महिने लोटून गेलेले आहे. मात्र, मार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. परंतु, प्रशासनाचे व अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नसल्याने कामाची गती जैसे थे अशीच आहे. दरम्यान, मोठे वाहन तर सोडाच पण साधी दुचाकीसुद्धा या मार्गाने चालविणे कठीण होऊन बसले आहे. शिवाय, शिरपूर ते नेरीपर्यंत संपूर्ण रस्त्यावर गिट्टी पसरलेली आहे. त्यामुळे वाहन चालवावे कसे, हा प्रश्न नागरिकांपुढे उभा ठाकला आहे.
कोट
गोविंदपूर हा मार्ग जंगलव्याप्त असून येथे नेहमी जंगली श्वापदांचा वावर असतो. परंतु, या मार्गाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने गोविंदपूर-शिरपूर -तळोधी बस बऱ्याच दिवसापासून बंद करण्यात आली आहे. हा ग्रामीण भाग असल्याने याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. या मार्गाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून सदर बससेवा पूर्ववत करावी.
- आनंद शेंडे,
सामाजिक कार्यकर्ते
गोविंदपूर ता. नागभीड.