यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या मारडा रस्त्याचे काम सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:54+5:302021-06-24T04:19:54+5:30
वर्धा नदीवर मारडा गावानजीक बंधारा बांधण्यात आल्याने यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक वरोरा शहरात दैनंदिन व्यवहार करिता येतात. वरोरा शहरातील व्यावसायिकांना ...
वर्धा नदीवर मारडा गावानजीक बंधारा बांधण्यात आल्याने यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक वरोरा शहरात दैनंदिन व्यवहार करिता येतात. वरोरा शहरातील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होत असतो. परंतु मागील काही वर्षापासून सदर मार्गाची अवस्था वाईट झाल्याने त्या भागातून येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत होते. नव्याने रस्ता तयार करण्याकरिता खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने निधी मंजूर झाला. यामध्ये जवळपास सहा किलोमीटरचा रस्ता तयार केला जाणार आहे. या रस्त्याला लागून आष्टी गावात जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण करण्यात येणार आहे. वरोरा तालुक्यातील भेंडाळा पोहा या मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन खासदार बाळू धानोरकर आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, उपसभापती देवानंद मोरे, पंचायत समिती सभापती रवींद्र धोपटे, उपसभापती संजीवनी भोयर, इंदिरा काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, प्रमोद मगरे, सुभाष दांदळे, बाळू चिंचोळकर आदी उपस्थित होते.