शंकरपूर येथे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे सुरू
By admin | Published: June 25, 2017 12:33 AM2017-06-25T00:33:02+5:302017-06-25T00:33:02+5:30
येथील ग्रामपंचायतच्यावतीने परिसरात महात्मा गांधी रोजगार हमीचे कामे सुरू केल्याने जाब कार्डधारक मजूर आनंदीत झाले आहे.
मजूर आनंदित : पांदण रस्ता, नाला खोलीकरणाला प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : येथील ग्रामपंचायतच्यावतीने परिसरात महात्मा गांधी रोजगार हमीचे कामे सुरू केल्याने जाब कार्डधारक मजूर आनंदीत झाले आहे.
जिल्हा परिषद सदस्य तथा गट नेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या पुढाकारातून राजू डहाके यांच्या शेताजवळील ते पाचगाव पांदण रस्त्याचे २५ लाख रुपये, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाजवळील २५ लाख रुपये किंमतीचे नाला खोलीकरण तर वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे.
या कामावर तिनशे मजूर कामावर आहे. या कामाचे भूमिपूजन सरपंच दिक्षा भगत, पंचायत समिती सदस्य रोशन ढोक, भावना बावणकर, बाजार समितीचे संचालक अमोद गौरकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक चौधरी, नितीन सावरकर, गणेश वनकर, ग्रामविस्तार अधिकारी सी.एन. पाटील आदी उपस्थित होते.