पेंढरी (कोके) येथे रोहयोची कामे सुरू
By Admin | Published: June 10, 2016 01:13 AM2016-06-10T01:13:42+5:302016-06-10T01:13:42+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत व स्थानिक ग्रामपंचायतीतर्फे पेंढरी (कोके) येथील दिवाण तलावावर रोहयोचे कामे धडाक्यात सुरू आहे.
अनेकांच्या हाताला काम : मजुरांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य
पेंढरी (कोके) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत व स्थानिक ग्रामपंचायतीतर्फे पेंढरी (कोके) येथील दिवाण तलावावर रोहयोचे कामे धडाक्यात सुरू आहे. यामुळे शेकडो मजुरांना रोजगार मिळाला आहे.
येथील मामा तलाव गट नं. ३२ मध्ये गाळ काढण्याचे काम सुरू आहे. सदर काम हे २३ एप्रिलला सुरू झाले असून कामाला तांत्रिक मंजुरी क्रमांक १६ जानेवारीला तर प्रशासकीय मंजुरी २९ जानेवारी मिळाली. या कामाची अंदाजपत्रकीय किंमत २४ लाख ८८ हजार २२० रूपये इतकी असून या कामावर ३१२ स्त्री- पुरुष मजूर आहेत. मात्र, या तलावाच्या पाळीला मजबुत करण्यासाठी जेसीबी न आल्यामुळे येथील तलावाची पाळ पोकळ झाली आहे. त्यामुळे या कामावर पंचायत समिती, जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधीनी जेसीबी आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)