हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा : प्रशांत ठाकरे

By Admin | Published: May 1, 2017 12:38 AM2017-05-01T00:38:03+5:302017-05-01T00:38:03+5:30

आयुष्याचा प्रवास यशासाठी असतो. त्यासाठी परीक्षा द्याव्याच लागतात. मात्र या परीक्षांतील यशासाठी तणावमुक्त राहा, हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा.

Work smarter than hardwork: Prashant Thakare | हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा : प्रशांत ठाकरे

हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा : प्रशांत ठाकरे

googlenewsNext

लोकमत व गायडन्स पॉर्इंटचा उपक्रम : विद्यार्थ्यांसाठी पार पडला सेमिनार व शिष्यवृत्ती परीक्षा
चंद्रपूर : आयुष्याचा प्रवास यशासाठी असतो. त्यासाठी परीक्षा द्याव्याच लागतात. मात्र या परीक्षांतील यशासाठी तणावमुक्त राहा, हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा. तुमचे प्रयत्न तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहचवू शकते, असा मोलाचा सल्ला डॉ. प्रशांत ठाकरे यांनी दिला. लोकमत व एज्युटेशनच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आज रविवारी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन एज्युटेशन डायरेक्टर मयूर वनकर यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून एज्युटेशनचे व्यवस्थापक मंजुषा हिंगाणे, लोकमत जिल्हा इव्हेंट प्रमुख अमोल कडूकर उपस्थित होते.
डॉ. प्रशांत ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सेमिनारमध्ये देशातील प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती दिली. त्याच बरोबर जेईई मेन, जेईई अ‍ॅडव्हान्स व ‘नीट’ परीक्षेचे बदलते स्वरूप यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच जेईई मेन, अ‍ॅडव्हान्स व नीटची तयारी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावी, त्यात पालकांनी आपल्या पाल्याला कशाप्रकारे मार्गदर्शन करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली.
दरम्यान, उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉ. प्रशांत ठाकरे यांना विविध प्रश्न विचारून शंकांचे निराकरण केले. एज्युटेशन डायरेक्टर मयूर वनकर यांनी अभ्यास कसा करावा, पालकांनी मुलांकडे कशा प्रकारे लक्ष द्यावे, परीक्षेसाठी कशी तयारी करावी आदी विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाखणण्याजोगे होता. सेमिनारमध्ये २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा इव्हेंट प्रमुख अमोल कडूकर यांनी तर आभार लोकमत सखी मंच सयोजिका पूजा ठाकरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Work smarter than hardwork: Prashant Thakare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.