चिमूर पालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:44 AM2021-02-23T04:44:51+5:302021-02-23T04:44:51+5:30
या काम बंद आंदोलनामुळे चिमूरकरांमध्ये कोरोनाची चिंता वाढली आहे. राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना या ...
या काम बंद आंदोलनामुळे चिमूरकरांमध्ये कोरोनाची चिंता वाढली आहे.
राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना या बॅनरखाली नगर परिषदेतील पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, विद्युत व इतर विभागातील रोजंदारी कर्मचारी यांनी नगर परिषदेत समायोजन करण्यासंबधी व दैनिक रोजीत वाढ, विशेष भत्त्यासाठी नगर परिषदेला दोनवेळा निवेदन दिले. ठराव मंजूर करून दिला. अजूनपर्यंत नगर परिषदेने त्यांचे समायोजन केले नाही व रोजीत वाढसुद्धा केली नाही. मात्र नगर परिषदमध्ये कार्यरत समावेशनासाठी पात्र अतिरिक्त कर्मचारी यांचे डिसेंबर २०१९, नोव्हेंबर २०२०, जानेवारी २०२१ अशा तीनवेळा त्यांच्या रोजीत वाढ देऊन आम्हा रोजंदारी कर्मचाऱ्यांवर नगर परिषद अन्याय करीत आहे. त्यामुळे नगर परिषदेतील सर्व रोजंदारी कर्मचारी यांनी बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
यापूर्वीसुद्धा ५ फेब्रुवारीला निवेदन दिले होते. मात्र नगर प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती. त्यामुळे सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले. दरम्यान जि.प. सदस्य गजानन बुटके, नगरसेवक कदीर, सारंग दाभेकर, प्रकाश बोकारे, पप्पू शेख आदींनी आंदोलनकर्ते कर्मचारी यांची भेट घेतली.