ब्रम्हपुरीत ग्राम रोजगार सेवकांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:31 AM2021-09-05T04:31:57+5:302021-09-05T04:31:57+5:30
सध्या महाराष्ट्र विधानसभामधील महात्मा गांधी रोजगार हमी योजना समिती दौरा केला असून समिती प्रमुख आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना अनेक ...
सध्या महाराष्ट्र विधानसभामधील महात्मा गांधी रोजगार हमी योजना समिती दौरा केला असून समिती प्रमुख आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले. दर महिन्याला मानधन देण्यात यावे, चार वर्षांची सेवा लक्षात घेऊन शासन सेवेत कायमस्वरूपी समावेश करण्यात यावे, मागील दोन वर्षांपासून थकीत मानधन व प्रवास भत्ता त्वरित देण्यात यावा, २३ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत संगणक परिचालकाकडून हजेरीपत्रक निर्गमित करणे, ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या विविध योजनेतील विकास कामातील मजुरी पेंमेट घरकूल योजनेप्रमाणे हजेरीपत्रक घेण्याचा शासन निर्णय निर्गमित करणे. अशा अनेक प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विनायक राखडे, गुरुदेव ढोरे, नारायण नवघडे, बाळकृष्ण शेंडे, चंदू जल्लेवार, मिथुन चंहादे, मनीष गिरी, आदी ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.
040921\img-20210904-wa0107.jpg
ग्रामसेवक रोजगार काम बंद आंदोलन करताना