वेकोलिने उत्पादनासोबतच कामगारहित जोपासावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 10:49 PM2018-09-09T22:49:53+5:302018-09-09T22:50:12+5:30
वेकोलिने उत्पादनासोबतच कामगारांचेही हित जपले पाहिजे. कामगार सुरक्षित राहिला तर उत्पादनाचे लक्ष्य गाठता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. वेकोलि नागपूर मुख्यालय अंतर्गत सर्व कामगार संघटना व वेकोलि व्यवस्थापनाच्या बैठकीत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलिने उत्पादनासोबतच कामगारांचेही हित जपले पाहिजे. कामगार सुरक्षित राहिला तर उत्पादनाचे लक्ष्य गाठता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. वेकोलि नागपूर मुख्यालय अंतर्गत सर्व कामगार संघटना व वेकोलि व्यवस्थापनाच्या बैठकीत ते बोलत होते.
ना. हंसराज अहीर म्हणाले, वेकोलि सातत्याने खालावत जाणारी स्थिती सुदृढ झाली पाहिजे. त्यासाठी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेतला पाहिजे. वेकोलि प्रगतीमध्ये बाधा आणणाऱ्या तसेच कामगारांच्या हिताआड येणाऱ्या बाबींचा सर्वांनी निपटारा करावा, ना. अहीर यांनी बैठकीत नमूद केले. पोवनी एकत्रीकरण प्रकल्पाअंतर्गत उत्पादन वाढ तसेच बल्लारपूर भूमिगत प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या. सोबतच पोवनी, धोपटाळा युजी. टू ओसी, बेल्लोरा, नायगाव, चिंचोली रिकॉस्ट, निलजई उकनी, मुंगोली आदी प्रकल्पांचा वेकोलि अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. वेकोलि अंतर्गत होणाºया चोºयांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवून उपाय योजना करण्याबात चर्चा झाली. यावेळी आमदार राजू तोडसाम, राहुल सराफ, विजय पिदूरकर, अरूण मस्की, राजु घरोटे, अॅड. प्रशांत घरोटे, सचिन डोहे, भारतीय मजदूर संघाचे रमेश बल्लेवार, इंटकचे के. के. सिंग, एच.एम.एस. चे शिवकुमार यादर, सुधीर गुरडे, लक्ष्मण सदाला, गुंडावार, फ्रान्सिस दारा, बी.एम.एसचे दिलीप सातपुते, विवेक अल्लेवार, मोरेश्वर आवारी उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांना मिळणार धनादेश
वेकोलि नागपूर मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या पोवनी, धोपटाला, मुंगोली, बेल्लोरा, नायगाव, निलजई, मुंगोली व उकणी या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना येत्या डिसेंबरपर्यंत धनादेश वाटप करण्यात येईल. तसेच पात्र व्यक्तींना नोकरीचे आदेश देण्यात येणार आहे. धोपटाळा युजी टू ओसी आणि बेल्लोरा-नायगाव प्रकल्पग्रस्तांना हाच न्याय देण्यात येईल. वेकोलि प्रशासनाने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश ना. अहीर यांनी बैठकीत दिले.