समाजाच्या विकासामध्ये महिला आघाडीचे काम महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:33+5:302021-01-08T05:33:33+5:30

माया राजूरकर : वरोरा येथे धनोजे कुणबी महिला आघाडीचा कार्यक्रम वरोरा : कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येक ...

The work of women leaders is important in the development of the society | समाजाच्या विकासामध्ये महिला आघाडीचे काम महत्त्वाचे

समाजाच्या विकासामध्ये महिला आघाडीचे काम महत्त्वाचे

googlenewsNext

माया राजूरकर : वरोरा येथे धनोजे कुणबी महिला आघाडीचा कार्यक्रम

वरोरा : कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजातील विविध आघाड्यांतर्फे कामे केली जातात. यात महिला आघाडीचे कामही महत्त्वाचे आहे, असे मत येथील सामाजिक कार्यकर्त्या माया राजूरकर यांनी व्यक्त केले.

वरोरा येथे धनोजे कुणबी महिला आघाडीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्योत्स्ना मत्ते, डाॅ. गीता पोफळी, कार्यकारिणीतील अध्यक्ष माधुरी बोंडे, उपाध्यक्ष उज्ज्वला ढवस, सचिव नीता बोढे, कोषाध्यक्ष लीना राजूरकर, सहकोषाध्यक्ष नीलिमा तुराणकर, आदींची यावेळी उपस्थिती होती. कोरोना संकटामुळे यावर्षी धनोजे कुणबी महिला आघाडी कार्यकारिणीची निवड न करता सन २०२०ची कार्यकारिणी सर्वांनुमते जशीच्या तशीच ठेवण्याचे ठरविण्यात आले. हा कार्यक्रम धनोजे कुणबी महिला आघाडी कार्यकारिणीचे सदस्या प्रतिभा बोढे यांच्या घरी आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आरती भोयर, तेजस्विनी पावडे, स्मिता सोनेकर, संगीता घुगल, रजनी घुगल, प्रतिभा जीवतोडे, विभा आगलावे यांची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: The work of women leaders is important in the development of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.