श्रमिक एल्गारची वनकार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:12 PM2017-11-28T23:12:09+5:302017-11-28T23:12:49+5:30

Workers collide on an elephant's ax | श्रमिक एल्गारची वनकार्यालयावर धडक

श्रमिक एल्गारची वनकार्यालयावर धडक

googlenewsNext
ठळक मुद्देपारोमिता गोस्वामी : वनपरिक्षेत्र अधिकाºयांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
जिवती : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात जिवती वनपरिक्षेत्र कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकाºयांना देण्यात आले.
रानडुकरांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतीला विनामूल्य सौर कुंपण देण्यात यावे, ग्रामपंचायत स्तरावर सरपनासाठी जळाऊ लाकडे उपलब्ध करावे, वनविभागाने गॅस वितरणाच्या नावावर वर्गणी जमा केली आहे, अशांना गॅसचे वितरण करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी सदर मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चाला तहसील कार्यालयापासून सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चा वनपरीक्षेत्र कार्यालयात धडकताच मोर्चाचे सभेमध्ये रुपांतर झाले.
मोर्चाला संबोधित करताना अ‍ॅड. गोस्वामी म्हणाल्या शेतकºयांचे प्रश्न शासनमान्य असून शेतकºयांच्या पिकांची नुकसान संघटना खपवून घेणार नाही. जिवती तालुक्यात रानटी डुक्कर नसल्याची खोटी माहिती वनविभागांकडून देण्यात येते. मात्र प्रत्यक्षात रानटी डुक्करांमुळे पिकांची प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच सरपनासाठी जंगलात जाणाºयांकडूनही वनविभागाचे अधिकारी अवैध वसुली करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर संघटनेचे घनशाम मेश्राम, प्रकाश टाकले, तालुका अध्यक्ष जालीम कोडापे, विमल कोडापे, मारोती सिडाम, गौरुबाई कोटनाके यांनी मनोगत व्यक्त केले.
संचालन महासचिव छाया सिडाम यांनी केले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन वनपरीक्षेत्र अधिकारी आडकिणे यांना दिले.
यावेळी सुरेश कोवे, पोचू सिडाम, यशवंत रायसिडाम, परशुराम वेलादी आदी उपस्थित होते.

Web Title: Workers collide on an elephant's ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.