श्रमिक एक्स्प्रेसमधील कामगारांचा जेवणावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:01:24+5:30

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून रोज ८, १० रेल्वे गाडया कोरोनामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांना घेऊन जात आहेत. त्यांना आईआरसीटीसीकडून नि:शुल्क जेवण व पाण्याची व्यवस्था केली आहे. बल्लारशाह रेल्वे स्थानकावर चार ठेकेदार येणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वे गाडयांमध्ये जेवणाच्या ठिकाणी वेज बिर्याणीचे पॉकीट देत आहे.

Workers in Shramik Express dispute over food | श्रमिक एक्स्प्रेसमधील कामगारांचा जेवणावरून वाद

श्रमिक एक्स्प्रेसमधील कामगारांचा जेवणावरून वाद

googlenewsNext
ठळक मुद्देबल्लारशाह रेल्वे स्थानकावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने श्रमिक विशेष गाडया सुरु केल्या आहते व त्यात त्यांना रेल्वे आणि आईआरसीटीसीकडून नि:शुल्क जेवण व पाणी देण्याचीही विशेष व्यवस्था केली आहे. शनिवारच्या सायंकाळी मात्र बल्लारशाह रेल्वे स्थानकावर श्रमिक विशेष रेल गाडीने लखनऊकडे जाणाऱ्या मजुरांनी दिल्या जाणाऱ्या जेवणावरून वाद घातला तर काहींनी शिळे अन्न असल्याचे म्हणत जेवण फेकून दिले. शेवटी काहींनी मध्यस्थी केल्यानंतर गाडी समोर निघाली.
बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून रोज ८, १० रेल्वे गाडया कोरोनामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांना घेऊन जात आहेत. त्यांना आईआरसीटीसीकडून नि:शुल्क जेवण व पाण्याची व्यवस्था केली आहे. बल्लारशाह रेल्वे स्थानकावर चार ठेकेदार येणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वे गाडयांमध्ये जेवणाच्या ठिकाणी वेज बिर्याणीचे पॉकीट देत आहे. शनिवारच्या सायंकाळी जी श्रमिक विशेष गाडी बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आली ती चक्क आठ तास उशिरा आल्याने जे जेवण सकाळी बनवले होते, तेच दिले. उष्णतामानामुळे त्याचा वास पाहून मजुरांनी वाद घातला. नंतर शिपायाच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आला.
दरम्यान, आम्हाला जेवढा ऑर्डर मिळतो, तेवढेच आम्ही पॉकीट पुरवतो. अशामधूनच असा वाद उद्भवतो, अशी माहिती जेवण पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने दिली.

Web Title: Workers in Shramik Express dispute over food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.