लॉयड मेटल कारखान्यासमोर कामगारांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 05:00 AM2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:01:01+5:30

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात कामगारांना पुरेशे वेतन दिले नाही. मागील महिन्यापासून कारखान्याचे उत्पादन पूर्ववत सुरु झाले असले तरी कामगारांना केवळ १५ दिवसांचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांना २६ दिवस काम, लॉकडाऊनच्या काळातील उर्वरित वेतन देणे, कामगारांची वेतनवाढ करार करणे, कामगारांचे ग्रेडेशन करणे, ५८ वर्ष पूर्ण झालेल्या तीन कामगारांना काढण्यात आले.

Workers sit in front of Lloyd Metal Factory | लॉयड मेटल कारखान्यासमोर कामगारांचे ठिय्या आंदोलन

लॉयड मेटल कारखान्यासमोर कामगारांचे ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देकामगारांत असंतोष : लॉकडाऊनपासून सातत्याने वेतनात कपात

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : लायड मेटलच्या व्यवस्थापनाकडून कोरोनाच्या लॉकडाऊनपासून कामगारविरोधी धोरण राबविले जात असल्याने कामगारवर्गात असंतोष फोफावला आहे. यातून लॉयड मेटल स्पंज आयर्न कामगार संघटनाच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ६ वाजतापासून कारखान्याच्या मुख्य गेटसमोर ठिय्या आंदोलन करुन संताप व्यक्त केला.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात कामगारांना पुरेशे वेतन दिले नाही. मागील महिन्यापासून कारखान्याचे उत्पादन पूर्ववत सुरु झाले असले तरी कामगारांना केवळ १५ दिवसांचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांना २६ दिवस काम, लॉकडाऊनच्या काळातील उर्वरित वेतन देणे, कामगारांची वेतनवाढ करार करणे, कामगारांचे ग्रेडेशन करणे, ५८ वर्ष पूर्ण झालेल्या तीन कामगारांना काढण्यात आले. त्यांना कामावर परत घेणे, मृत्यू झालेल्या कामगारां़च्या कुटुंबीयांना कामावर घेणे, लॉकडाऊनच्या काळातील १६ सुपरवायझरचे संपूर्ण वेतन देणे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, लॉयड मेटल स्पंज आयर्न कामगार संघटनाचे कार्याध्यक्ष रोशन पचारे, पवन आगदारी व कारखान्याच्या व्यवस्थापक प्रशांत पुरी, कार्मिक अधिकारी शशिकांत बोर्डे यांची मुख्य गेटच्या आत लागून असलेल्या भारतीय लायड मेटल मजदूर संघ यांच्या कार्यालयात सयुक्त दोनदा बैठक झाली. मात्र उभय पक्षात सकारात्मक चर्चा न झाल्याने युनियन पदाधिकारी बैठक सोडून निघून आले. व्यवस्थापनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे दुसऱ्या पाळीतल्या कामगारांनीही संताप व्यक्त करीत आंदोलनात सहभाग घेतला. पाऊस सुरु असतानाही कामगाराचे आंदोलन सुरुच होते. याबाबत कारखान्याच्या कार्मिक अधिकारी बोर्डे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून घुग्घुसचे सहायक पोलीस निरीक्षक विरसेन चंहादे, गौरीशंकर आमटे, सचिन बोरकर, सुधीर मत्ते, रंजित भुरसे, योगेश शार्दुल, दिनेश वाकडे हे आंदोलनस्थळी तैनात होते.
 

Web Title: Workers sit in front of Lloyd Metal Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप