एसटीत ५० टक्के उपस्थितीत कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:28 AM2021-05-09T04:28:35+5:302021-05-09T04:28:35+5:30
बॉक्स चंद्रपूर विभागाला दैनंदिन ३० लाखांचा फटका चंद्रपूर विभागात चार आगार येतात. मात्र लॉकडाऊनमुळे केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच बस धावत ...
बॉक्स
चंद्रपूर विभागाला दैनंदिन ३० लाखांचा फटका
चंद्रपूर विभागात चार आगार येतात. मात्र लॉकडाऊनमुळे केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच बस धावत आहेत. त्यामुळे दिवसातून केवळ एक किंवा दोन बस धावतात. त्यामुळे विभागाला दररोज २५ ते ३० लाखांचा फटका बसत आहे. इतर वर्षी मार्च ते एप्रिल महिन्यात एसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात असायचे.
कोट
चंद्रपूरमध्ये चालक-वाहकांसाठी १५ टक्के उपस्थिती, तर प्रशासकीय व यांत्रिकी विभागामध्ये ५० टक्के उपस्थितीत कामकाज सुरू आहे. बसफेऱ्या बंद असल्याने चंद्रपूर विभागाला दररोज २५ ते ३० लाखांचा फटका बसत आहे.
सचिन डफळे, आगार व्यवस्थापक, चंद्रपूर
कोट
एसटी बंद असल्याने महामंडळाला मोठा फटका बसत आहे. मार्च ते एप्रिल महिन्यात बस फुल्ल भरून धावायच्या. मात्र मागील वर्षापासून आगारातूनच बस बाहेर निघत नसल्याचे चित्र आहे. - वाहक
-----
मी दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहे. परंतु, अशी परिस्थिती कधीच बघितली नाही. मात्र कोरोनामुळे मागील वर्षापासून बस धावत नसल्याने महामंडळाला मोठा फटका बसत आहे. -चालक
-------
जिल्ह्यातील एकूण आगार चार, अधिकारी ३२
चालक ६५०, यांत्रिकी कर्मचारी २२०
वाहक ५६०, प्रशासकीय कर्मचारी ९५