कार्यक्षेत्राच्या अटींचा बळीराजाला फास

By admin | Published: September 21, 2015 12:47 AM2015-09-21T00:47:28+5:302015-09-21T00:47:28+5:30

परवानाधारक सावकाराकडील कर्जमाफ करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसा शासननिर्णय काढला.

Workplace violation | कार्यक्षेत्राच्या अटींचा बळीराजाला फास

कार्यक्षेत्राच्या अटींचा बळीराजाला फास

Next

सावकाराची कर्जमुक्ती फसवी : ६४ पैकी सहा पात्र, जाचक अटीने केला शेतकऱ्यांचा घात
चंद्रपूर : परवानाधारक सावकाराकडील कर्जमाफ करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसा शासननिर्णय काढला. मात्र, पात्रतेचे निकाल जटील असल्याने तालुक्यातील ६४ शेतकऱ्यांपैकी सहा शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत, केवळ परवानाधारक सावकाराच्या कार्यक्षेत्राच्या अटीमुळे अद्याप ५८ शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती सावकारी कर्जाचा फास कायम आहे.
शासननिर्णय आल्यानंतर सहायक निबंधक सहकारी कार्यालयाने तालुक्यातील १९ परवानाधारक सावकारांना कर्जदार शेतकऱ्यांची यादी मागितली. त्यातील ११ सावकारांनी तालुक्यातील ७२ गावांतील ४१० कर्जदारांची यादी निबंधक कार्यालयाला दिली. त्यापैकी ६४ कर्जदार व्यक्ती सातबाराधारक शेतकरी असल्याची अंतिम माहिती तलाठी कार्यालयात पाठविली. अंतिम छानणीत ६४ शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले. मात्र, शासननिर्णयानुसार परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस कर्ज दिले होते. त्यामुळे या योजनेसाठी संबंधित शेतकरी पात्र ठरणार नाही, अशी अट होती. त्यामुळे केवळ ६४ शेतकऱ्यांपैकी सहा शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. वरोरा तालुक्यात १९ परवानाधारक सावकार आहेत. त्यातील काही सावकारांचा परवाना शहरापुरता मर्यादित आहे. काहींचा तालुक्यातील विशिष्ट गावापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे बाजूच्या गावातील एखाद्या शेतकऱ्याने कार्यक्षेत्र ठरलेल्या सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास ते अपात्र ठरत आहे.
या कर्जमाफी योजनेसाठी शेगाव येथील दोन परवानाधारक सावकाराकडून सहा शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज पात्र ठरले. त्यामुळे या शेतकऱ्यांचे व्याजासह एक लाख २१ हजार ४०१ रुपये आता माफ होणार आहे. (शहर प्रतिनिधी)

अट रद्द करा
शेतकरी हा जवळ असलेल्या बाजारपेठेत आपला शेतमाल विकत असतो. तेथूनच तो कर्जाची उचल करीत असतो. भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शेतकरी वरोरा बाजारपेठेत माल विकत असतात. वरोरा येथील सावकारांकडून कर्ज घेत असतात. त्यामुळे शासनाने कर्जमाफीसाठी परवानाधारक सावकाराच्या कार्यक्षेत्राची अट रद्द करुन सातबाराधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे. .

Web Title: Workplace violation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.