ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर आधारित होणार कामे

By admin | Published: April 7, 2015 01:05 AM2015-04-07T01:05:40+5:302015-04-07T01:05:40+5:30

ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू संबोधले जाते. ग्रामपंचायत स्तरावरून अनेक विकासात्मक योजना राबवून

Works based on gram panchayat's income | ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर आधारित होणार कामे

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर आधारित होणार कामे

Next

 ग्रामविकास विभागाचा निर्णय : विकास कामांना लागणार टाच
चंद्रपूर :
ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू संबोधले जाते. ग्रामपंचायत स्तरावरून अनेक विकासात्मक योजना राबवून गावकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिले जातात. मात्र यावर आता टाच येणार आहे. राज्य शासनाने नुकतेच परिपत्रक काढून ग्रामपंचायतीचे जेवढे उत्पन्न तेवढेच काम हे धोरण अवलंबिले आहे.
ग्रामीण भागात विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विकास कामे करताना, उत्पन्नाची मर्यादा नव्हती. मात्रा आता एजन्सी म्हणून विकास कामे करताना ग्रामपंचायतींना उत्पन्नाच्या आधारे मर्यादा येणार आहे.
खासदार, आमदारांचा स्थानिक विकास निधीतून शासनाच्या इतर योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना आता मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. परंतु, ग्रामपंचायतीकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने त्यांना प्राप्त होणाऱ्या निधीतून व्यापक प्रमाणावर विकास कामे होऊ शकत नाहीत. अशातच कामांची गुणवत्ता राखण्यातही अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना आता जेवढे उत्पन्न त्याच आधारावर ग्रामपंचायत स्तरावरची कामे करावी लागणार आहेत. ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न ५० हजार आहे, त्यांना १० लाखांपर्यंत तर ज्यांचे उत्पन्न ५० हजारपेक्षा जास्त आहे, त्यांना १५ लाखांपर्यंत विकास कामे करता येणार आहे.
यापूर्वी ग्रामपंचायतींना कामे करण्याबाबत जे अधिकार होते, त्यावर या नवीन निर्णयाद्वारे बंधने आली आहेत. त्यामुळे या नव्या निर्णयातून पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. अशातच ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न फार कमी आहे, अशा ग्रामपंचायतीनी विकास कामे कशी करावीत, हा पेचही निर्माण झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

ग्रामपंचायतीची कामे
केंद्रीय वित्त आयोग निधीतील कामे
शासकीय योजनेतील समाविष्ट कामे.
मनरेगाची ५० टक्के किमान कामे.
स्वनिधीतील विविध प्रकारचे कामे.

या आहेत अटी
ग्रामपंचायतींना गावठाणच्या हद्दीतील मूलभूत सुविधेची कामे, विकासाची कामे करता येणार आहेत. शाळा इमारत, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशी जनहिताची कामे हद्दीच्या बाहेर असतील तरीही करता येणार आहे.

Web Title: Works based on gram panchayat's income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.