नागभीड येथे जीएसटीवर कार्यशाळा

By admin | Published: November 16, 2016 01:42 AM2016-11-16T01:42:15+5:302016-11-16T01:42:15+5:30

केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने नागभीड येथे जीएसटी या विषयावर विदर्भस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

Workshop on GST at Nagbhid | नागभीड येथे जीएसटीवर कार्यशाळा

नागभीड येथे जीएसटीवर कार्यशाळा

Next

मार्गदर्शन : विक्रीकर अधिकाऱ्यांचा सत्कार
नागभीड : केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने नागभीड येथे जीएसटी या विषयावर विदर्भस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. रविवारी संपन्न झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह विक्रीकर अधिकारी रवी गायगोले यांनी सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी शशीभूषण नागपूरे हे होते.
या कार्यशाळेस केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुकुंद दुबे, मनीष गुप्ता यांची उपस्थिती होती. जिल्हा विक्रीकर अधिकारी रवी गायगोले यांनी या कार्यशाळेत जीएसटी कायद्याबद्दल व्यापाऱ्यांनी मनात कोणतीही शंका न ठेवता सहकार्य केल्यामुळेच अभय योजनेला चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला व विदर्भात चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरल्याचे सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना रवी गायगोले यांनी सांगितले की, व्यावसायिक जो करत भरतात त्या कराच्या रकमेतून शासन विविध योजना राबवित असतो. सिमेवर लढत असलेल्या जवानांचे वेतन देत असतो. यावेळी जिल्हा विक्रीकर अधिकारी रवी गायगोले यांनी जिल्ह्यात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष शशीभूषण नागपुरे यांच्या हस्ते रवी गायगोले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद दुबे यांचेही समयोचित भाषण झाले. रवि गायगोले यांचेसारखे अधिकारी विभागास लाभले तर शासनास मोठा महसूल प्राप्त होईल,असे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Workshop on GST at Nagbhid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.