रेल्वे इंजिन चालकांना कार्यशाळेत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:31 AM2021-09-06T04:31:25+5:302021-09-06T04:31:25+5:30

बल्लारपूर : प्रवासी सुपरफास्ट रेल्वे गाडी असो की मालगाडी ती नियोजित ठिकाणी घेऊन जाणे हे प्रत्येक इंजिन चालकाचे कर्तव्य ...

Workshop guidance to railway engine drivers | रेल्वे इंजिन चालकांना कार्यशाळेत मार्गदर्शन

रेल्वे इंजिन चालकांना कार्यशाळेत मार्गदर्शन

Next

बल्लारपूर : प्रवासी सुपरफास्ट रेल्वे गाडी असो की मालगाडी ती नियोजित ठिकाणी घेऊन जाणे हे प्रत्येक इंजिन चालकाचे कर्तव्य असते. अनावधानाने त्यांच्या हातून चुका होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनद्वारा नेहमी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर बल्लारशाह रेल्वे स्थानकावर लोको पायलट व गार्ड लॉबीच्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता महेशकुमार, सहायक मंडळ संरक्षण (सेफ्टी) अधिकारी कमलेश कुमार, सहायक मंडळ अभियंता एन.ए. नागदिवे यांनी इंजिन चालकांना व लॉबीतील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की रेल्वे स्थानकावर गाडीचे इंजिन बदलविताना (शटिंग) कशी काळजी घेतली जावी, सिग्नलचा धोका कसा ओळखावा व शिस्तबद्ध काम करण्याचा व अपघात टाळण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमात मुख्य लोको नियंत्रक एस.एच. मणी, एम. वेंकटेश्वरलू, स्टेशन मॅनेजर रामलाल सिंग, यू.के. दास, संरक्षण सल्लागार राजेंद्रप्रसाद (लोको) यांची उपस्थिती होती. संचालन मुख्य लोको नियंत्रक अन्नम वेंकटेश्वरलू यांनी केले व आभार राजेंद्रप्रसाद यांनी मानले.

050921\img-20210904-wa0248.jpg

मार्गदर्शन करताना रेल्वेचे अधिकारी

Web Title: Workshop guidance to railway engine drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.