मनपा व जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:19 PM2018-03-23T23:19:37+5:302018-03-23T23:19:37+5:30
शहर महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व समुचीत प्राधिकारी, सर्व सोनोग्राफी केंद्रधारक, सल्लागार समिती सदस्य व वैद्यकीय अधिकारी यांच्याकरिता गुरुवारी मनपा सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा पार पडली.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शहर महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व समुचीत प्राधिकारी, सर्व सोनोग्राफी केंद्रधारक, सल्लागार समिती सदस्य व वैद्यकीय अधिकारी यांच्याकरिता गुरुवारी मनपा सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनपा महापौर अंजली घोटेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले, आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे, जिल्हा शल्य चिकित्सक उमेश नावाडे, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर आदी उपस्थित होते.
डॉ. उमेश नावाडे प्रास्ताविकेत म्हणाले, भारतात पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी होत असून, या कायद्यातील तरतुदींचे कोटकोरपणे पालन करणे अंत्यत गरजेचे आहे. उपरोक्त कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येते. तेव्हा सदर कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यास सर्वानी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत मनपा चंद्रपूर व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर या कार्यक्षेत्रातील एकुण १८० ते २०० सभासदांचा सहभाग होता. त्यात पदाधिकारी, अधिकारी, सोनोग्राफी केंद्रधारक, वैद्यकीय अधिकारी, सल्लागार समिती सदस्य व इतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यशाळेचे संचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी व उपस्थिताचे आभार डॉ. अंजली आंबटकर यांनी मानले.
यावेळी मनपा विधी अधिकारी अॅड. अनिल घुले व जिल्हा विधी समुपदेशक अॅड. मंगला बोरीकर यांनी पावर पार्इंट प्रसेंटेशनद्वारे पीसीपीएनडीटी कायद्यातील तरतुदीचे सादरीकरण केले. मनपा चंद्रपूर येथील सर्वसाधारण सभागृह येथे झालेल्या पिसीपिएनडीटी कार्यशाळेत मनपा आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्रातील पदाधिकारी, अधिकारी, डॉक्टरर्स, वैद्यकीय अधिकारी तसेच मनपाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.