नवीन विक्रीकर संगणकीय प्रणालीबाबत कार्यशाळा
By admin | Published: May 25, 2016 01:33 AM2016-05-25T01:33:39+5:302016-05-25T01:33:39+5:30
व्यापाऱ्यांना विक्रीकराचे विवरणपत्र अतिशय सुलभरितीने भरता यावेत, म्हणून विक्रीकर विभागाने एसएपी प्रणालीच्या ...
चंद्रपूर : व्यापाऱ्यांना विक्रीकराचे विवरणपत्र अतिशय सुलभरितीने भरता यावेत, म्हणून विक्रीकर विभागाने एसएपी प्रणालीच्या माध्यमातून नवीन आॅटोमेशन सिस्टीम सुरू केली. एप्रिल २०१६ नंतरच्या कालावधीचे विवरणपत्र नवीन आॅटोमेशन सिस्टीमद्वारे भरावयाची आहेत. ही नवीन आॅटोमेशन सिस्टीम कशी वापरावयाची याबाबतची माहिती देण्याकरिता स्थानिक आयएमए हॉलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आॅटोमेशन सिस्टीमसंबंधी मुंबई विक्रीकर आयुक्तांच्या कार्यालयातून विक्रीकर उपआयुक्त राजेंद्र अडसूळ व गिरीश नेहते तसेच चंद्रपूर कार्यालयाचे विक्रीकर उपायुक्त सुनिल लहाने व प्रफुल्ल मेंढुलकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर येथील विविध प्रतिष्ठानांचे प्रतिनिधी, चार्टर्ड अकाउंटंट, विक्रीकर सल्लागार व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळा अल्पावधीत आयोजित करून यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर येथील सहा. विक्रीकर आयुक्त गिरीष चौरे आणि विक्रीकर अधिकारी श्रावणकर, मडावी, शंकरवार, शेंडे, बुरडकर, पाटणकर तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)