स्वास्थ, समृद्धी व आनंदाच्या रहस्यावर आज कार्यशाळा

By admin | Published: May 21, 2016 12:56 AM2016-05-21T00:56:47+5:302016-05-21T00:56:47+5:30

लोकमत सखी मंच राजुरा आणि गीता पाठशाला राजुरा, सत्संग सेवा समिती राजुरा, जेसीआय राजुरा रॉयल, राजस्थानी महिला मंडळ,....

Workshop on the secret of health, prosperity and happiness today | स्वास्थ, समृद्धी व आनंदाच्या रहस्यावर आज कार्यशाळा

स्वास्थ, समृद्धी व आनंदाच्या रहस्यावर आज कार्यशाळा

Next

ई.व्ही. गिरीश करणार मार्गदर्शन : सखी मंचतर्फे राजुरा येथे आयोजन
राजुरा : लोकमत सखी मंच राजुरा आणि गीता पाठशाला राजुरा, सत्संग सेवा समिती राजुरा, जेसीआय राजुरा रॉयल, राजस्थानी महिला मंडळ, आर्य वैश्य समाज महिला मंडळ राजुरा, राजुरा महिला मंडळ राजुरा, नाभिक समाज महिला मंडळ राजुरा, पद्मशाली समाज महिला मंडळ राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयद्वारा आयोजित मुंबईचे वक्ते प्रा. इ. व्ही. गिरीश यांची एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा उद्या २१ मे शनिवारला आयोजित करण्यात आली आहे.
सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे कार्यक्रम होणार आहे. या शिबिरात स्वास्थ्य, समृद्धी आणि आनंदी राहण्याच्या रहस्याचा उलगडा करण्यात येणार असून आपल्यामध्ये असलेल्या ‘हिरो’ला ओळखा, संबंधात मधुरता, राजयोगाद्वारे स्रेहपूर्ण जीवन जगण्याची कला, स्वास्थ्य आपल्या हाती, सकारात्मक चिंतन, मुलांना उच्चशिक्षित करण्याची कला यासह अनेक विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे.
प्रा. ई. व्ही. गिरीश हे प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात १७ वर्षांपासून सेवा देत असून ही संस्था पाच महाद्विपामध्ये १३५ देशामध्ये कार्यरत आहे. नऊ हजार केंद्रांमधून मानव कल्याणकारी एक सशक्त पिढी घडविण्याचे काम अविरत सुरू आहे. प्रा.गिरीश यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), तारापूर आॅटोमिक ऊर्जा केंद्र, आयआयटी मद्रास, आयआयटी रुराकी, आयआयटी पटना, भारतीय वायु सेवासह अनेक ठिकाणी मार्गदर्शन केले आहे. मेडिटेशन, संकल्प, संबंध कर्मामध्ये मधुरता अवगत करण्याची कला, वर्तमान स्थितीमधील आव्हाने यावर मार्गदर्शन होणार असून हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय उर्वरक व रसायन मंत्री हंसराज अहीर राहणार असून माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ते मुंबईचे प्रा. ई.व्ही. गिरीश, चंद्रपूर-गडचिरोली वणी क्षेत्राच्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी कुसुमदीदी, मुख्य अतिथी म्हणून राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष मंगला आत्राम, प्रभारी उपविभागीय अधिकारी धर्मेश फुसाटे, पर्यवेक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, नगर परिषद राजुराचे उपाध्यक्ष अरुण धोटे, राजयोगी ब्रह्मकुमार दीपकभाई, जि.प. सदस्य अविनाश जाधव, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, प्राचार्य दौलतराव भोंगळे, माजी अध्यक्ष बंडू माणुसमारे उपस्थित राहणार आहेत.
२१ मे रोजी सायंकाळी ६.३० ते ९ यावेळेवर मार्गदर्शन सुरू होणार असून मोफत व बहुमूल्य जीवन परिवर्तनाच्या या शिबिरात उपस्थित राहावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीकरिता संपर्क आनंद भेंडे (९२२६१५३८३९), प्रा. बी.यू. बोर्डेवार (९९२२९०४१२५), जयश्री देशपांडे (९६२३२३९३४३), कृतिका सोनटक्के (९९२२९३०१५१), संध्या पत्तेवार (९६२३८२९९८६), अनुराधा कल्लुरवा (९८२३८७४९१८), विवेक चौधरी (९६५७४०७४४९), शारदा गड्डम (९४०४१२५१९१), रंभा गोठी (०७१७३- २२३८०३), सुधा गुंडावार (९२७३३०३७६४), सुमन मसादे (९०१११७१८५०) यांच्याशी संपर्क साधावा.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Workshop on the secret of health, prosperity and happiness today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.